वाढदिवसानिमित्त हृतिक रोशनने केली नव्या फिल्मची घोषणा, दीपिका पादुकोनसोबत दिसणार 'फायटर' चित्रपटात!
हृतिक रोशन याचा आज 46वा वाढदिवस आहे, याच निमित्ताने हृतिकने नव्या फिल्मची घोषणा करत चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलं आहे.
मुंबई : बॉलिवूडची मस्तानी आणि एव्हरग्रीन सुपरस्टार हृतिक रोशन या दोघांना एकत्र पाहणं ही अनेक चाहत्यांची इच्छा होती, या दोघांना एकाच पडद्यावर तुम्ही लवकरच पाहणार आहात. हृतिक आणि दीपिकाची डॅशिंग जोडी फायटर या चित्रपटात झळकणार आहे. हृतिक रोशनचा आज 46वा वाढदिवस आहे आणि याच निमित्ताने त्याने या चित्रपटाची आज घोषणा करत चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलंय. फायटरचा व्हिडीओ लूक हृतिकने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram
सिद्धार्थ आनंद करणार फाइटरचं दिग्दर्शन हृतिक रोशन यापूर्वी वॉर या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत काम केलं होतं. वॉर ही अॅक्शन फिल्म बॉक्स ऑफिसवर झळकली होती. आता पुन्हा फाइटरच्या निमित्ताने अॅक्शन फिल्म घेऊन हृतिक पडद्यावर कमबॅक करणार आहे. फाइटर चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत, ज्यांनी लॉर आणि बॅंग बॅंगसारखे सुपरहिट सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.
View this post on Instagram
स्वप्न खरंच सत्यात अवतरतायत, म्हणतेय दीपिका पादुकोन! फायटर चित्रपटात हृतिकसोबत मुख्य भूमिकेत दिपिका दिसणार आहे, या चित्रपटात हृतिक रोशन एअरफोर्स ऑफिसरची भूमिका करणार आहे. दीपिकाच्या पात्राबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. दीपिकाने फायटर चित्रपटाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत स्वप्न खरंच सत्यात अवतरतात असं कॅप्शन दिलं आहे.
हॅपी बर्थडे हृतिक!
हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने हृतिकला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या, या पोस्टमध्ये तिने हृतिकचा बेस्ट डॅड असा उल्लेख केला आहे. तर अक्षय कुमार, विद्युत जामवाल, प्रिती झिंटा, रितेश देशमुख, निर्माती फारह खान, माधुरी दीक्षित, सोफी चौधरी अशा अनेक बॉलीवूड कलाकारांनी हृतिकच्या काही आठवणी सांगत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.