Sushmita Sen : सुष्मिता सेनचा ब्रेकअप; रिलेशनशिप संपलं, मित्र म्हणून कायम राहणार, सोशल मीडियावर केलं जाहीर
Sushmita Sen : सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन यांनी त्यांचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे आम्ही मित्र म्हणून राहू असं सुष्मिताने सांगितलं आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेन्ड असलेल्या रोहमनच्या ब्रेक-अपच्या वावड्या उठत होत्या. आता ती गोष्ट सत्यात आली असून सुष्मिता सेनचे ब्रेक-अप झालं आहे. अभिनेत्री सुष्मिता सेनने ही माहिती तिच्या सोशल मीडियावरुन दिली आहे. नातं जरी संपलं असलं तरी प्रेम कायम राहिल असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सुष्मिता सेनने सोशल मीडियावर तिचा आणि रोहमनचा एक फोटो शेअर केला आहे. त्या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की, "आमची सुरुवात मित्र म्हणून झाली, आम्ही मित्र म्हणून जगलो. आता आमचं नातं संपलं आहे, प्रेम कायम राहिल."
View this post on Instagram
सुष्मिता सेन आणि रोहमन हे 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. रोहमन हा मॉडेल असून त्याने अनेक कार्यक्रमात रॅम्प वॉक केले आहेत. सुष्मिता सेनने आर्या या वेब सीरीजच्या माध्यमातून कमबॅक केलं आहे. या वेब सीरीजला इंटरनॅशनल एम्मी मध्ये बेस्ट ड्रामा सीरीजमध्ये नॉमिनेशन मिळालं होतं. सुष्मिता सेन ही सिंगल मदर आहे. तिने अलिशा आणि रेनी नावाच्या दोन मुलींना दत्तक घेतलं आहे.
सुष्मिता सेनला 1994 साली मिस युनिव्हर्सचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर दस्तक या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. तिने अनेक हिट बॉलिवूड चित्रपट दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Aarya 2 Trailer : 'आर्या-2' चा ट्रेलर प्रदर्शित; लेडी डॉनच्या भूमिकेत सुष्मिता सेन, दमदार लूक चर्चेत
- Miss Universe 2021 : 1170 हिऱ्यांचा कोट्यवधींचा मुकूट, बक्षीसांचा पाऊस, मिस युनिवर्स हरनाजला काय काय मिळालं?
- Sushmita Sen Arya 2 first look : 'शेरनी इज बॅक'; सुष्मिता सेनने शेअर केला 'आर्या-2' चा फर्स्ट लूक