एक्स्प्लोर

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार

Sunetra Pawar Speech : खालच्या पातळीवरील टीकेला मी शब्दांनी उत्तर देणार नाही, तर माझ्या कामातून उत्तर देईन, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिलं. 

मुंबई : काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या इंग्रजी भाषेतील भाषणाचे आणि त्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत त्यांची खंबीर पाठराखण केली. महिला राजकारणात यशस्वी होऊ शकत नाहीत किंवा जबाबदारी समर्थपणे सांभाळू शकत नाहीत, अशी विरोधकांची संकुचित मानसिकता आहे, असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या या खंबीर पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून महिला नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना शब्दांनी नव्हे तर कामातून उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

"सुनेत्रा पवारांचे भाषण आत्मविश्वासपूर्ण"

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्या कार्यक्षमतेचे आणि इंग्रजी भाषणातील आत्मविश्वासाचे जोरदार समर्थन केले होते. महिला नेत्या कोणतीही मोठी जबाबदारी प्रभावीपणे पेलू शकतात, असा विश्वास व्यक्त करत फडणवीसांनी काँग्रेससह विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

"टीकेला कामातून उत्तर देणे हाच माझा मार्ग"

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "महिला नेतृत्वाबद्दलच्या संकुचित मानसिकतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले स्पष्ट आणि ठाम उत्तर मनापासून स्वागतार्ह आहे. माझ्या इंग्रजी भाषणाचे आणि आत्मविश्वासाचे त्यांनी केलेले कौतुक माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. महिला राजकारणात यशस्वी होऊ शकत नाहीत अशा पूर्वग्रहातून होणारी टीका ही महाराष्ट्रातील महिलांच्या कर्तृत्वाचा अवमान करणारी आहे. विरोधकांच्या या वक्तव्यातून त्यांची महिलांविषयीची मानसिकता स्पष्ट होते."

अशा खालच्या पातळीवरील टीकेला मी शब्दांनी उत्तर देणार नाही, तर माझ्या कामातून आणि कर्तृत्वातूनच उत्तर देईन. महाराष्ट्रातील महिला सक्षम आणि आत्मविश्वासू असून प्रत्येक जबाबदारी पेलण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. 

देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली भूमिका ही केवळ व्यक्तिगत समर्थनाची नसून राजकारणातील प्रत्येक महिलेच्या आत्मविश्वासाची पाठराखण करणारी आहे, असे सांगत सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

ही बातमी वाचा :

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांची निर्दोष मुक्तता, तब्बल 20 वर्षानंतर मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
रामदास कदमांसह नितीन बानगुडे पाटलांची निर्दोष मुक्तता, तब्बल 20 वर्षानंतर मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget