एक्स्प्लोर

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

बी.टेक चे शिक्षण घेतलेला 27 वर्षीय आरोपी निझामी शमसुद्दीन याने आपल्या तांत्रिक ज्ञानाचा गैरवापर केला. पकडले जाण्याच्या भीतीपोटी त्याने स्वतःचा मूळ मोबाईल नंबर कधी वापरलाच नाही.

मुंबई : शिकून-सवरून उच्चशिक्षित झालेला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, (Student) पण डोक्यात मात्र भामटेगिरीचे 'हायटेक' प्लॅन्स. स्वतःचा मोबाईल नंबर वापरला तर पोलीस पकडतील म्हणून व्हॉट्सॲपवर व्हर्च्युअल फेक नंबर जनरेट केला, मालकाचा विश्वास संपादन करून ड्रायव्हर म्हणून कामाला लागला आणि 12 लाखांची लक्झरी कार(Car) घेऊन पसार झाला. पण, मेघवाडी पोलिसांनी (Police) या बी.टेक स्टुडंटच्या हुशारीची सर्व सूत्रे तांत्रिक तपासाद्वारे छाटून टाकत त्याला पुण्यातील कोंढव्यातून बेड्या ठोकल्या आहेत!

बी.टेक चे शिक्षण घेतलेला 27 वर्षीय आरोपी निझामी शमसुद्दीन याने आपल्या तांत्रिक ज्ञानाचा गैरवापर केला. पकडले जाण्याच्या भीतीपोटी त्याने स्वतःचा मूळ मोबाईल नंबर कधी वापरलाच नाही. त्याने इंटरनेटच्या साहाय्याने व्हॉट्सॲपवर बनावट नंबर जनरेट केला आणि याच नंबरवरून तक्रारदार जिगर घनश्याम पटेल यांच्याशी संवाद साधून ड्रायव्हरची नोकरी मिळवली. 22 जून 2026 रोजी सकाळच्या सुमारास अवघ्या 17 मिनिटांच्या कालावधीत, जिजामाता रोड, पंप हाऊस, अंधेरी (पूर्व) येथील रामगुरूदेव सोसायटीतून आरोपीने जिगर पटेल यांची 12,45,000/- रुपये किमतीची मारूती सुझुकी XL6 स्मार्ट हायब्रिड कार मालकाच्या परवानगीशिवाय चोरून नेली. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हैदराबादवरुन कार जप्त

आरोपीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी कितीही तांत्रिक क्लिपत्या वापरल्या असल्या, तरी मेघवाडी पोलिसांच्या 'गुन्हे प्रकटीकरण पथका'ने अत्यंत सूक्ष्म तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या जाळ्याचा वापर केला. तपासाचे धागेदोरे जोडत पथकाने थेट पुण्यातील कोंढवा भागात धाड टाकून निझामी शमसुद्दीन याला ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरी केलेली लक्झरी कार हैदराबाद येथे लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने हैदराबाद गाठून निवेदन पंचनाम्यांतर्गत 12 लाख 45 हजारांची XL6 कार रीतसर जप्त केली.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण शाळीग्राम आणि पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कौतुकास्पद कारवाई केली. या कारवाईत सहभागी तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संजय सरोळकर, सहाय्यक फौजदार पवार, पोलीस हवालदार राठोड, पोलीस शिपाई कापसे, खरात, आणि कांजर यांनी हि कौतुकास्पद कामगिरी केली आहे.  दरम्यान, तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीसाठी करणाऱ्या या बी.टेक स्टुडंटला वाटले होते की, तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटेल, पण मेघवाडी पोलिसांच्या सतर्कतेने आणि हायटेक तपासाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी सध्या गजाआड असून या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
Pune Dj Action : मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
Amravati Crime news: दोन वर्ष नीट बोलली; नंतर बिनसलं, बोलणं बंद केल्यानं तो संतापला, पाठलाग केला अन् अमरावतीत भर चौकात त्यानं वार करून संपवलं, चेहऱ्यावर ना खेद ना खंत
दोन वर्ष नीट बोलली; नंतर बिनसलं, बोलणं बंद केल्यानं तो संतापला, पाठलाग केला अन् अमरावतीत भर चौकात त्यानं वार करून संपवलं, चेहऱ्यावर ना खेद ना खंत
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
Embed widget