एक्स्प्लोर
सुशांतचा 'दिल बेचारा' उद्या रिलीज... शुक्रवारी संध्याकाळी प्रिमिअर!
सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेला चित्रपट दिल बेचारा हा आता डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 24 जुलैला म्हणजेच उद्या हा सिनेमा ओटीटीवर येणार आहे. आता नुकतीच त्याची वेळ या ओटीटीने जाहीर केली.
![सुशांतचा 'दिल बेचारा' उद्या रिलीज... शुक्रवारी संध्याकाळी प्रिमिअर! Sushant Singh rajput last Movie dil bechara premiere at 7 30 pm on friday सुशांतचा 'दिल बेचारा' उद्या रिलीज... शुक्रवारी संध्याकाळी प्रिमिअर!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/06203359/Dil-Bechara-Trailer.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : दर शुक्रवारी चित्रपट रिलीज होतात. दर शुक्रवारी प्रेक्षकांच्या थिएटरवर उड्या पडतात. हा शुक्रवार मात्र त्याला अपवाद आहे. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होतो आहे. मात्र त्याला यंदा थोडी भावनिक किनार आहे. कारण हा चित्रपट सुशांतसिंह राजपूतचा आहे आणि तो दुर्दैवाने त्याचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. मुकेश छाब्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट जाहीर झाला तेव्हापासूनच सुशांतचे चाहते या सिनेमाकडे डोळे लावून बसले आहेत.
सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेला चित्रपट दिल बेचारा हा आता डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 24 जुलैला म्हणजेच उद्या हा सिनेमा ओटीटीवर येणार आहे. आता नुकतीच त्याची वेळ या ओटीटीने जाहीर केली. शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजता हा चित्रपट ओटीटीवर येईल. त्यानंतर तो प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
पाहा ट्रेलर :
सुशांतचा मित्र असलेल्या आणि इंडस्ट्रीत कास्टिंग डिरेक्टर म्हणून नाव कमावलेल्या मुकेश छाब्राने हा चित्रपट दिग्दर्शित केल आहे. हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या चित्रपटाचा हा रिमेक आहे. हा रोमॅंटिक ड्रामा असून दोन व्यक्तिरेखांंभवती फिरतो. किझी बसू हिला थायरॉइडचा कर्करोग आहे. त्याच्या उपचारासाठी ती रुग्णालयात आली आहे. तिथे तिची भेट होते मॅनीशी. मॅनीला ऑस्टेसरकोमा हा आजार आहे. सुरूवातीला ती त्याला विशिष्ट अंतरावर ठेवते. पण दोघांच्या आवडीनिवडी.. इतक्या जुळतात की, दोघे प्रेमात पडतात. पण तिची इच्छा पूर्ण करायला दोघे पॅरिसला जातात. अशा घडामोडींचा हा सिनेमा आहे. सुशांतसोबत संजना संघी या अभिनेत्रीची यात मुख्य भूमिका आहे.
सिनेमाचं प्रचंड कुतुहल
सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सुशांतने हे पाऊल का उचललं यावर प्रचंड खल सुरु आहे. यानिमित्ताने बॉलिवूडमध्ये सुरु असलेला नेपोटिझम, आऊटसायडर्सना मिळणारी ट्रिटमेंट याबद्दल अनेक उलटसुलट मतं व्यक्त होत आहेत. पण नेटिझन्समध्ये मात्र सुशांतबद्दल सहानुभूती असतानाच इंडस्ट्रीत आऊटसायडरला मिळणाऱ्या वर्तणुकीबद्दल संताप आहे. म्हणून इथे नाव कमवायला येणाऱ्या सुशांतसारख्या मुलांना पाठिंबा मिळतो आहे. त्यातूनच त्याचा हा सिनेमा पाहायचा चंग नेटकऱ्यांनी बांधला आहे.
सुशांतच्या आवाहनाची आठवण...
सुशांतसिंह राजपूतचा ड्राईव्ह हा चित्रपट पडला होता. तो जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा, माझा हा सिनेमा त्याच्या चाहत्यांनी पाहावा. तो पाहिला गेला तरच मला पुढचा सिनेमा मिळेल अशी विनंती त्याने त्याच्या चाहत्यांना केली होती. त्याची आठवण आज प्रत्येक सुशांतप्रेमी करतो आहे. आपला पुढचा सिनेमा ओटीटीवर आला तर तो चालणार नाही, म्हणून तो थिएटरवर रिलीज व्हावा असं त्याला वाटत होतं. याला आदरांजली म्हणून ओटीटीवर येणारा त्याचा हा सिनेमा यशस्वी करण्याचा चंग सुशांतच्या प्रेमींनी बांधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)