एक्स्प्लोर
'भाभीजी घर पे है'मधून सनी लिओनचं मालिकेत पदार्पण
मुंबई : मोठ्या पडद्यावर बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सनी लिओन लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. 'बिग बॉस', 'स्प्लिट्सव्हिला' यासारख्या कार्यक्रमात दिसल्यानंतर सनी चक्क टीव्ही मालिकेत दिसणार आहे.
'अँड टीव्ही'वर गाजलेल्या 'भाभीजी घर पे है' या मालिकेत सनी दिसणार आहे. सोमवारपासून सनीने चित्रीकरणाला सुरुवात केली असून ती स्वतःच्याच भूमिकेत दिसणार आहे.
अंगुरी भाभी (शुभांगी अत्रे), अनिता (सौम्या टंडन), विभूती (आसिफ शेख) आणि मनमोहन (रोहिताश गौड) यांच्यासोबत सनी स्क्रीन शेअर करणार आहे. आपल्या सिनेमाच्या हिरोच्या शोधात सनी दिग्दर्शकासोबत येते, असं कथानक पाहायला मिळेल.
सनी स्वभावाला अत्यंत लाघवी असून शूटिंग करताना खूप मजा आल्याचं अभिनेत्री शुभांगी अत्रेने सांगितलं. तिने पटकन सगळ्यांशी जुळवून घेतलं, माझा 'सही पकडे है' हा डायलॉग शिकवताना मजा आली, असंही शुभांगी म्हणते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement