Sunny Leone And Arbaaz Khan : अरबाज खानच्या 'या' प्रश्नाला उत्तर देताना सनी लिओनी भावूक; म्हणाली...
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीच्या (Sunny Leone) अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते.
Sunny Leone And Arbaaz Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीच्या (Sunny Leone) अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी सनीने अरबाज खानच्या (Arbaaz Khan) 'द पिंच' (The Pinch) या शोमध्ये हजेरी लावली होती.या शोमध्ये अरबाजने सनीला तिच्या एका सोशल मीडिया पोस्टबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी अरबाजच्या प्रश्नाला उत्तर देताना सनी भावूक झाली.
प्रभाकरसाठी सनी मागत होती मदत
अरबाजने सनीला तिच्या एका जून्या सोशल मीडियावरील पोस्टबद्दल प्रश्न विचारला. या पोस्टमुळे सनीला अनेकांनी ट्रोल देखील केले होते. ती पोस्ट व्हायरल झाली होती. त्या पोस्टमध्ये सनीनं प्रभाकर नावाच्या व्यक्तीबद्दल नेटकऱ्यांना माहिती दिली होती. प्रभाकरला मेडिकल ट्रीटमेंटसाठी आर्थिक मदत हवी होती.
मुलाखतीमध्ये सनीनं सांगितलं, 'प्रभाकरला माझी मुलगी निशा मामा म्हणत होती. मी त्याला माझा भाऊ मानत होते.' पुढे सनीने सांगितले की, प्रभाकारला किडनीचा गंभीर आजार होता. त्याला किडनी ट्रांसप्लांट करायचे होते. त्यासाठी तिने लोकांकडे मदत मागितली होती. 'पण आम्ही प्रभाकरला वाचवू शकलो नाही', असं सनी म्हणाली.
View this post on Instagram
सनीच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमी नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. इन्स्टाग्रामवर तिला जवळपास 49.5 मिलियन लोक फॉलो करतात. काही दिवसांपूर्वी ‘करणजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे कथानक हे सनीच्या जीवनावर आधारित आहे.
महत्त्वाच्या बातम्या :