एक्स्प्लोर

SSR Case | ड्रग्ज प्रकरणात मुंबईत एनसीबीचं धाडसत्र, रियाच्या घराची झडती, सॅम्युअल मिरांडाच्या घरीही पथक

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी एनसीबीची दोन पथकं दाखल झाली आहे. ते रियाच्या घराची झडती घेणार आहे.

मुंबई : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे. अशातच याप्रकरणात तपास करणाऱ्या नार्कोटिक्स ब्युरोने ड्रग्ज कनेक्शनमध्ये तपास सुरु केला आहे. आज सकाळीच सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी एनसीबीची दोन पथकं दाखल झाली आहे. ते रियाच्या घराची झडती घेणार आहे. एनसीबीने केलेल्या या कारवाईनंतर आता रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक होणार का? अशा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाती ड्रग अँगल समोर आल्यानंतर एनसीबीकडून वेगाने तपास सुरु आहे. एनसीबीच्या तपासा दरम्यान, सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचं समोर आलं. या प्रकरणाशी संबंधित अनेक ड्रग्ज तस्करांना अटकही करण्यात आली. यादरम्यान अधिक तपास करण्यासाठी एनसीबीचं एक पथक आज सकाळीच रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झालं.

एवढचं नाहीतर दिल्लीहून देखील नार्कोटीक्स ब्युरोचं एक पथक रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झालं आहे. म्हणजेच, रियाच्या घरी एनसीबीची दोन पथकं गेली आहेत. एनसीबीच्या या पथकासोबतच एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा हे देखील उपस्थित आहेत. असं सांगण्यात येत आहे की, रियाच्या घराची झाडाझडती घेण्यात येणार असून एनसीबीकडून मोठं सर्च ऑपरेशन सुरु आहे. तसेच केपीएस मल्होत्रा म्हणाले की, ते एका तपास प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी आले आहेत.

रिया शौविकचं व्हॉट्सअॅप चॅट

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती या दोघांमधली व्हॉट्सअॅप चॅट समोर आलं आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमधून खुलासा झाला आहे की, रिया आपला भाऊ शौविककडे ड्रग्जची मागणी करत होती. एबीपी न्यूजला 15 मार्च 2020 रोजीचं व्हॉट्सअॅप चॅट हाती लागलं आहे. या चॅटमध्ये रिया आपला भाऊ शौविक चक्रवर्तीकडे ड्रग्जची मागणी करत आहे. रिया यामध्ये एका तिसऱ्या व्यक्तीचाही उल्लेख करत आहे. रिया म्हणत आहे की, तो दिवसातून चार वेळा पिचो, त्या अंदाजाने प्लान कर. त्यानंतर शौविक तिला म्हणतो की, 'आणि बड्स, त्याला पाहिजे?' रिया म्हणते, 'हो बडसुद्धा.' शौविक म्हणतो की, 'मी 5 ग्राम बडची व्यवस्था करू शकतो, यापासून 20 सिगरेट तयार होतात.'

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2 OTT Verdict: 'धुरंधर 2' भारतीय सिनेमांचा नवा बादशाह; थेट राजामौलींच्या RRR ला दिली मात; रेकॉर्डब्रेक घोडदौड सुरूच
'धुरंधर 2' भारतीय सिनेमांचा नवा बादशाह; थेट राजामौलींच्या RRR ला दिली मात; रेकॉर्डब्रेक घोडदौड सुरूच
Sejal Pawar Controversy: सेजलची चौकशी होणार, 5 सदस्यीय समिती स्थापन; प्रणित मोरेच्या शोमधील 'टॉक' डॉक्टर युवतीच्या अंगलट
सेजलची चौकशी होणार, 5 सदस्यीय समिती स्थापन; प्रणित मोरेच्या शोमधील 'टॉक' डॉक्टर युवतीच्या अंगलट
Gulabi Saadi: 'गुलाबी साडी' सुपरहिट ठरलं, पण मानधन.., प्राजक्ता घागनं सांगितला खास किस्सा
'गुलाबी साडी' सुपरहिट ठरलं, पण मानधन.., प्राजक्ता घागनं सांगितला खास किस्सा
Prem Bhati Death: वडिलांना सांगितलं 10 मिनिटांत येतो, पण नियतीच्या मनात...पत्नीला माहेरी सोडून परतल्यानंतर प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा अपघाती मृत्यू
वडिलांना सांगितलं 10 मिनिटांत येतो, पण नियतीच्या मनात...पत्नीला माहेरी सोडून परतल्यानंतर प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा अपघाती मृत्यू

व्हिडीओ

America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump on Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली अपडेट, शांतता कराराच्या घोषणेनंतर दिवस सांगितला...
अखेर ट्रम्प यांनी टायमिंग साधलं, बड्डेच्या दिवशीच शांतता कराराची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार?
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
Share Market : अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Urmila Matondkar Ex-Husband Mohsin Akhtar Married Again: घटस्फोटानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या एक्स-हसबंडनं पुन्हा थाटला संसार; दुसऱ्या पत्नीसोबत सुखी संसाराची सुरुवात PHOTOs
घटस्फोटानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या एक्स-हसबंडनं पुन्हा थाटला संसार; दुसऱ्या पत्नीसोबत सुखी संसाराची सुरुवात PHOTOs
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Embed widget