एक्स्प्लोर
इंटरनेटवर सुहानाच्या टी-शर्टची चर्चा, किंमत तब्बल...
पण टॉप टू बॉटम पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये असलेल्या सुहानाच्या टी शर्टची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार आहे.
मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी किड्सच्या यादीत सध्या सुहाना खानची चर्चा आहे. सुहाना आपल्या लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे सातत्याने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी आई गौरीच्या हॅलोवीन पार्टीत गोल्डन ड्रेसमध्ये दिसली होती. आता वडील शाहरुख खानच्या बर्थ डे पार्टीत ती कॅज्युअल लूकमध्ये आली. पण टॉप टू बॉटम पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये असलेल्या सुहानाच्या टी शर्टची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार आहे.
गिवेंची (Givenchy) चं टी-शर्ट, त्यासोबत डेनिम शॉर्ट्स आणि पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स परिधान केलेला सुहानाचा हा लूक कूल होता. पण सुहानाच्या फक्त टी-शर्टची किंमत सुमारे 52 हजार रुपये होती.
काही दिवसांपूर्वी सुहानाने परिधान केलेल्या ऑरेंज रंगाच्या ड्रेसची किंमत सुमारे 60 हजार रुपये होती. या ड्रेसमुळे सुहाना ट्रोलही झाली होती.
दरम्यान, सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. त्याचवेळी ती एका ऑडिशन स्टूडिओमध्ये दिसली होती.
सुहाना लंडनमध्ये शिकत आहे, पण सध्या सुट्टीसाठी भारतात आली आहे. सुहानाला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची इच्छा असल्याचं शाहरुखने यापूर्वीही सांगितलं होतं. शिवाय शबाना आझमी यांनीही सुहानाच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement