एक्स्प्लोर

मोठी बातमी! आजपासून दहा दिवस सिनेमागृह बंद; लोकसभा निवडणुक आणि 'IPL'चा फटका

Cinema Hall Shut Down : 2024 च्या सुरुवातीपासून दाक्षिणात्य चित्रपट धमाका करत आहेत. अनेक मेगाबजेट चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता तेलंगणात 10 दिवस चित्रपटगृह बंद असणार आहेत. लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) आणि 'IPL 2024'चा चित्रपटांना मोठा फटका बसला आहे.

Cinema Hall Shut Down : बॉलिवूडने (Bollywood) 2024 हे वर्ष चांगलच गाजवलं. पण 2024 च्या सुरुवातीपासूनच दाक्षिणात्य चित्रपटांनी (South Movies) अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. तेजा सज्जा (Teja Sajja) आणि प्रशांत वर्मा (Prashant Varma) यांचा 'हनुमान' (Hanuman) या वर्षातला पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट होता. या चित्रपटाने महेश बाबूच्या (Mahesh Babu) 'गुंटूर कामर' (Guntur Kaaram) आणि धनुषच्या (Dhanush) 'कॅप्टन मिलर' (Captain Miller) सारख्या चित्रपटांना मागे टाकलं. आतापर्यंत अनेक मेगा बजेट चित्रपट रिलीज झालेले नाहीत. अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) पासून ते प्रभासच्या (Prabhas) 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD) आणि रामचरण (Ramcharan) आणि ज्युनिअर एनटीआरचे (JR NTR) चित्रपट या वर्षात धमाका करण्यासाठी सज्ज आहेत. पण तरीही तेलंगाणामध्ये 10 दिवस चित्रपटगृह बंद असणार असल्याचं समोर आलं आहे.

सरतं वर्ष गाजवल्यानंतर 2024 च्या सुरुवातीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर अनेक चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाले. अशातच आता कोई मोईचा एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार, तेजा सज्जाचा (Teja Sajja) 'हनुमान' (Hanuman) आणि सिद्धू जोनलगड्डाचा (Siddu Jonnalagadda) 'टिल्लू स्क्वायर' (Tillu Sqare) सोडून इतर कोणत्याही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केलेली नाही. 

10 दिवस बंद असणार सिनेमागृह

टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीच्या पदरी गेल्या काही दिवसांपासून निराशा येत आहे. लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) आणि आयपीएलमुळे (IPL 2024) अनेक चांगल्या सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता तेलंगणातील अनेक सिंगल स्क्रीन्स थिएटर्सने काही दिवसांसाठी सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळए सलग होणाऱ्या नुकसानापासून त्यांचा बचाव होईल. 17 मेपासून 10 दिवस तेलंगणातील चित्रपटगृह बंद असणार आहेत. कदाचित जून महिन्यात चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्यात येऊ शकतात. 

थिएटर्सचं होणारं नुकसान वाचवण्यासाठी अनेक लोकप्रिय कलाकारांचे जुने चित्रपट सिनेमागृहात पुन्हा रिलीज करण्यात येणार आहेत. आगामी बिग बजेट चित्रपटांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. यात प्रभासचा 'कल्कि 2898 एडी', अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2'सह अनेक बिग बजेट चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने थिएटर मालकांना मोठा फटका बसत आहे. अद्याप तेलंगणातील सिंगल थिएटर असोसिएशनने थिएटर बंद असण्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. 

25 मेला प्रदर्शित होणार 'हे' चित्रपट

25 मे 2024 रोजी 'लव मी','गँग्स ऑफ गोदावरी','सुधीर बाबूचा 'हरोम हारा' आणि 'सत्यभामा' प्रदर्शित होणार आहे. निवडणुकीनंतर पुन्हा एकदा चित्रपटांना सुगीचे दिवस येतील. 'पुष्पा 2' आणि 'कल्कि 2898 एडी' हे चित्रपट सिनेमागृहात चांगलाच गल्ला जमवलील, अशी आशा आहे.

संबंधित बातम्या

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील लूक समोर; हात मोडला पण जलवा दाखवलाच

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget