Sonu Sood : 'त्या' व्हिडीओमुळे सोनू सूद सोशल मीडियावर ट्रोल, उत्तर देत म्हणाला, 'श्रीरामानेही शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती...'
Sonu Sood : सोनू सूद सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. त्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर वातावरण चांगलच तापलं आहे.

Sonu Sood : बॉलीवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. सोनू सूदने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे त्याला बरंच ट्रोल देखील करण्यात आलंय. त्यामुळे सोशल मीडियावरचं वातावरणही चांगलच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
सोनू सूदने त्याच्या एक्सवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगा रोटी बनवाताना दिसत आहे. पण एका अशी गोष्ट या व्हिडीओमध्ये घडताना दिसत आहे आणि या गोष्टीचं सोनू सूद समर्थन करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलंय. विशेष म्हणजे त्याने हा व्हिडीओ शेअर करुन त्याची तुलाना श्रीरामाशी देखील केली आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
सोनू सूदने शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक मुलगा जेवण बनवताना त्यामध्ये थुंकताना दिसत आहे. त्यावर एका युजरने हा व्हिडीओ शेअर करत सोनू सूदला ट्रोल केलं. त्याने तो व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, ही रोटी सोनू सूदला जाऊन द्यायला हवी. यावर सोनू सूदनेही पोस्ट करत उत्तर दिलं आहे. इतकचं नव्हे तर त्याने या गोष्टीची तुलना श्रीरामाशी देखील केलीये.
थूक लगाई रोटी "सोनू सूद" को “पार्सल” की जाये, ताकि भाईचारा बना रहे ! https://t.co/e3mghsFgkG pic.twitter.com/ANcE6yquTJ
— Sudhir Mishra 🇮🇳 (@Sudhir_mish) July 19, 2024
सोनू सूदची पोस्ट काय?
सोनू सूदने या ट्रोलिंगला उत्तर देत म्हटलं की, 'श्रीरामांनी शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती मग मी हे का नाही खाऊ शकत? हिंसेचा अहिंसेने पराभव करता येतो. फक्त माणूसकी जिवंत ठेवली पाहिजे.' सोनू सूदच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावरही तुफान चर्चा सुरु आहे.
हमारे श्री राम जी ने शबरी के झूठे बेर खाए थे तो मैं क्यों नहीं खा सकता
— sonu sood (@SonuSood) July 20, 2024
हिंसा को अहिंसा से पराजित किया जा सकता है मेरे भाई🤍
बस मानवता बरकरार रहनी चाहिए ।
जय श्री राम🚩 https://t.co/uljActwMrR
सोनू सूद झाला ट्रोल
सोनू सूदच्या या पोस्टमुळे त्याला प्रचंड प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय. एका युजरने कमेंट करत म्हटलं की,तुझे विचार एका बाजूला आणि सत्य परिस्थिती एका बाजूला. हा रोटी बनवणारा माणूस नाही माता शबरी आहे आणि तूही राम नाहीस. तर एका युजरने म्हटलं की, शबरी रामभक्त होती आणि तिने ती बोरं द्वेषापायी उष्टी केली नव्हती. तिने ते केवळ तिच्या निरागसतेमुळे असं केलं. व्हिडीओमध्ये दाखवलेल्या व्यक्तीला ना त्याच्या ग्राहकांवर प्रेम आहे आणि अशा व्यक्तीच्या कृतीची तुलना माता शबरीशी करताय? तू खूप मूर्ख माणूस आहेस.
माता शबरी रामभक्त थीं और उन्होंने बेर द्वेषवश झूठे नहीं किए थे। वे तो केवल अपने भोलेपन में यह जानने के लिए कि बेर मीठे हैं या नहीं, चखकर श्रीराम को दे रही थीं।
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) July 20, 2024
वीडियो में दिखाया गया व्यक्ति न तो अपने ग्राहकों से प्रेम करता है और न ही वह इसलिए थूक लगा रहा है कि रोटी का स्वाद चख…
सोनू बकचोदी अपनी जगह और सत्य अपनी जगह ये रोटी बनाने वाला न तो माता शबरी है और न ही तुम राम ?
— The Abhishek Tiwary Show (@atsshow7) July 20, 2024
माता शबरी प्रेम की प्रतीक है ये घृणा में थूक मिला रहा है ।
ही बातमी वाचा :
Sonu Sood : गरीब मुलीच्या मदतीला धावला सोनू सूद, मदत करत जिंकली चाहत्यांची मनं























