Sonu Sood : गरीब मुलीच्या मदतीला धावला सोनू सूद, मदत करत जिंकली चाहत्यांची मनं
Sonu Sood Latest News : सोनू सूद नेहमीच त्याच्या चांगल्या कामामुळे चर्चेत असतो. याच कारणामुळे लोक त्याला रिल आणि रिअल लाईफ हिरो म्हणतात.
मुंबई : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) एक उत्तम अभिनेता असण्यासोबत रिअल लाईफ हिरोही आहे. याचं उदाहरण तो वेळोवेळी गरजूंना मदत करत देत असतो. कोरोनाकाळातही सोनू सूदने अनेकांना मदत केली होती. सोनू सूद नेहमीच त्याच्या चांगल्या कामामुळे चर्चेत असतो. याच कारणामुळे लोक त्याला रिल आणि रिअल लाईफ हिरो म्हणतात. आता पुन्हा एकदा सोनूच्या दिलदारपणाचा आणखी एक नमुना पाहायला मिळाला आहे.
गरीब मुलीच्या मदतीला धावला सोनू सूद
कोरोना काळात सोनू सूदने अनेक कामगार आणि प्रवासी मजुरांना मदत केली होती. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवासी कामगारांना त्याने घरी पोहचवण्यासाठीचा सर्व खर्च केला होता. याशिवाय त्याने अनेक गरीबांनाही मदत केली. सोनू नेहमी अनेकांची मदत करताना पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा त्याने गरीब गरजू मुलीला मदत केली आहे. यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सोनू सूदने घेतली गरजू मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी
सोनू सूदने एका गरीब गरजू मुलीला शिक्षणासाठी मदत केली आहे. या मुलीला शिक्षणाची इच्छा आहे, पण घरची परिस्थिती नसल्यामुळे तिच्या शिक्षणात अडथळे येत होते. अखेर सोनू सूद या मुलीच्या मदतीला धावला आहे. अलीकडेच आंध्र प्रदेशातील एका मुलीच्या शिक्षणासाठी नेटीझनने सोनू सूदची मदत मागितली होती. आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील बनवानूर येथील देवीकुमारीला बीएससीचे शिक्षण घ्यायचं आहे, पण तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तिला साथ देत नसल्याने तिला शिक्षणापासून दूर राहावं लागलं. एका नेटिझनने हे गोष्ट X मीडियावर शेअर केली आणि सोनू सूदला टॅग करत त्याची मदत मागितली. यानंतर सोनू सूदने या ट्वीटला लगेच उत्तर दिलं. ट्वीट रि-ट्वीट करत सोनू सूदने लिहिलं की, 'कॉलेजला जाण्यासाठी तयार रहा, तुझा अभ्यास थांबणार नाही. तिच्या आवडीच्या कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळेल'. सोनू सूदच्या या दिलदारपणाने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत.
View this post on Instagram
नेहमीच सर्वांच्या मदतीला धावतो सोनू सूद
कोरोनाच्या काळात सोनू सूदने हजारो गरीब आणि गरजू लोकांना मदत केली होती. कोरोनाकाळात सोनू सूद खरा हिरो बनला. तेव्हापासून जेव्हाही कोणाला काही मदतीची गरज असते, तेव्हा ते सोनू सूदला टॅग करून X (ट्विटर) द्वारे त्याच्या समस्येबद्दल सांगतात. सोनू सोशल मीडियावर मदत मागणाऱ्यांना नेहमी प्रतिसाद देतो आणि त्यांना मदत करतो. यामुळे त्याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात एक वेगळा आदर निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :