एक्स्प्लोर

Sonu Sood on Hardik Pandya : IPL मध्ये ट्रोल होणाऱ्या हार्दिक पांड्याला सोनू सूदचा फुल्ल सपोर्ट! पोस्ट शेअर करत म्हणाला,"आज जयजयकार करता, उद्या चिडवता"

Sonu Sood on Hardik Pandya : IPL मध्ये ट्रोल होत असलेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ अभिनेता सोसू सूदने खास पोस्ट लिहिली आहे. MI च्या कर्णधारासाठी सोनू सूद मैदानात उतरलेला पाहायला मिळत आहे.

Sonu Sood Supports Hardik Pandya : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) नेहमीच विविध विषयांवर आपलं मत मांडत असतो. सोनूचा मोठा चाहतावर्ग असून त्याच्या प्रत्येक कृतीचं चाहत्यांकडून कौतुक होत असतं. आता आयपीएलमध्ये (IPL) ट्रोल होत असलेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार (Mumbai Indians) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्या समर्थनार्थ अभिनेता सोनू सूदने खास पोस्ट लिहिली आहे. MI च्या कर्णधारासाठी सोनू सूद मैदानात उतरलेला पाहायला मिळत आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला गेल्या काही दिवसांपासून चांगलच ट्रोल केलं जात आहे. सामना हारल्यानंतर हार्दिकला अनेक निगेटिव्ह कमेंट्सचा सामना करावा लागत आहे. हार्दिक पांड्या पाच वेळा चॅम्पियन ठरला असला तरी त्याच्या नव्या टीमने 'IPL 2024'मध्ये आतापर्यंत दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

सोनू सूदचा हार्दिक पांड्याला पाठिंबा (Sonu Sood Tweet on Hardik Pandya)

सोनू सूदने ट्वीट केलं आहे की,"आपण आपल्या खेळाडूंचा आदर करायला हवा. या खेळाडूंमुळे आपल्याला आपल्या भारत देशाचा अभिमान वाटतो. हे खेळाडू देशाचं नाव सातासमुद्रापार नेणात. हे खेळाडूच देशाची मान उंचावतात. एक दिवस तुम्ही या खेळाडूंचा जयजयकार करता, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना चिडवता. यात त्यांचं नव्हे तर आपलं अपयश आहे. मला क्रिकेट प्रचंड आवडतो. तसेच माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक क्रिकेटपटूदेखील मला आवडतो. तो कोणत्या फ्रँचायझीसाठी खेळतोय याने मला फरक पडत नाही. तसेच तो कर्णधार म्हणून खेळतोय की संघातील 15 वा खेळाडू यानेही मला फरत पडत नाही. खेळाडू आपले हिरो आहेत". 

सोनू सूदने हार्दिक पांड्याचा उल्लेख करता त्याच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांबद्दल त्याने त्याचं मत मांडलं आहे. सोनू सूदचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन्ही क्रिकेटच्या स्टेडियमवर हार्दिकला चिडवण्यात आलं होतं. खेळाडूंना दिली जाणारी ही वागणूक अभिनेता सोनू सूदला अजिबात आवडली नाही. त्यामुळे त्याने खास पोस्ट शेअर केली आहे.

संबंधित बातम्या

Hardik Pandya: हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Embed widget