Sonu Nigam Breaks Down : कृष्ण कुमारच्या मांडीवर डोकं ठेवून सोनू निगम ढसाढसा रडला, व्हिडीओ व्हायरल, चाहते हळहळले...
Sonu Nigam Breaks Down : तीशाचे वडील आणि निर्माते कृष्ण कुमार यांची भेट घेताना सोनू निगमला भावना अनावर झाल्या.
Sonu Nigam Breaks Down : अभिनेता, निर्माते, टी-सीरिज कंपनीचे सहमालक कृष्ण कुमार यांची मुलगी तीशा कुमार (Tishaa Kumar) हिचे कर्करोगाने वयाच्या 21 व्या वर्षी निधन झाले. जर्मनी येथील एका रुग्णालयात उपचारा दरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. मुंबईत तीशावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर तीशासाठी एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या शोकसभेतील एक व्हिडीओ व्हायरल होत असून सोनू निगम (Sonu Nigam) याला भावना अनावर झाल्याचे दिसून आले.
गायक सोनू निगम याने तीशासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेला हजेरी लावली होती. तीशाचे वडील आणि निर्माते कृष्ण कुमार यांची भेट घेताना सोनू निगमला भावना अनावर झाल्या. सोनू निगमने कृष्ण कुमार यांच्या मांडीवर डोक ठेवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. हे दृष्य पाहताना अनेकांची मने हेलावली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
एका वृत्तानुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू निगम आणि तीशा कुमार यांच्यात एक खास बाँडिंग होते. सोनू निगम हा तीशाच्या बालपणापासून तिला ओळखत होता. दोघांमध्ये एक चांगले बाँडिंग होते. मात्र, तीशाच्या निधनाने सोनू निगमला मोठा धक्का बसला आहे.
कृष्ण कुमारच्या मांडीवर डोके ठेवून ढसाढसा रडला...
व्हिडीओनुसार, सोनू निगम हा आधी कृष्ण कुमारला भेटतो आणि नंतर त्याच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागतो. यावेळी कृष्ण कुमार त्यांचे सांत्वन करताना दिसत आहेत.
कृष्ण कुमार हे टी-सीरीजचा सह-मालक आहेत. सोनू निगमचेही टी-सीरीजशी 30 वर्षांहून अधिक काळ संबंध आहेत. टी-सीरीज आणि सोनू निगम यांनी मिळून अनेक गाणी तयार केली आहेत.
तीशाला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकारांची उपस्थिती
तीशा कुमारच्या शोकसभेत सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. उदित नारायण, शान, बॉबी देओल, अनिल कपूर, कार्तिक आर्यन, फरदीन खान, सुनील शेट्टी, राकेश रोशन आदींसह अनेक कलाकारांनी कृष्ण कुमार आणि कुटुंबाचे सांत्वन केले.