Sonnalli Seygall : बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर; अभिनेत्री सोनाली सहगलला कोरोनाची लागण
Sonnalli Seygall : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली सहगलला कोरोनाची लागण झाली आहे.
Sonnalli Seygall : देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. बॉलिवूडमध्येदेखील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आता अभिनेत्री सोनली सहगलला (Sonnalli Seygall) कोरोनाची लागण झाली आहे. सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
सोनालीने सोशल मीडियावर कोरोनाची लागण झाल्याची माहिती देत लिहिले आहे, दोनवर्षांनंतर आता पुन्हा एकदा मला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मास्कचा वापर करायला हवा. सुरक्षिततेचे पालन करावे. रोगप्रतिकारशक्तीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी.
View this post on Instagram
'या' सेलिब्रिटींना झाली कोरोनाची लागण
करण जोहरच्या बर्थडे पार्टीत सहभागी झालेल्या आदित्य रॉय कपूर, कार्तिक आर्यन, कतरिना कैफ आणि शाहरुख खान या सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. पण कतरिना कैफ आता कोरोनामुक्त झाली आहे. किंग खानला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी 'पठाण' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली होती.
बॉलिवूड विश्व पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर अनेक बॉलिवूड कलाकार कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे. अभिनेता शाहरुख खानला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अशातच अभिनेत्री सोनाली सहगलला कोरोनाची लागण झाली आहे.
संबंधित बातम्या
Bollywood Celebs Corona Positive : बॉलिवूड पुन्हा कोरोनाच्या विळख्यात! शाहरुख ते कार्तिक आर्यनसह ‘या’ कलाकारांना झाली लागण
Akshay Kumar : अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; कान्स चित्रपट महोत्सवात दिसणार नाही खिलाडी कुमार





















