Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi: जे छोटे व्यवसाय रोजगार देत असत, चामड्याचे उद्योग, वस्त्रोद्योग, वाहन उद्योग, विविध उद्योगांमधील उत्पादन हे सर्व संपले असल्याचा हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi: तुम्हाला 'मेड इन चायना' दिसेल, तुम्हाला 'मेड इन व्हिएतनाम' दिसेल, तुम्हाला 'मेड इन बांग्लादेश' दिसेल, पण तुम्हाला 'मेड इन इंडिया' दिसणार नाही. याचे कारण म्हणजे नोटाबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आपली उत्पादन व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. जे छोटे व्यवसाय रोजगार देत असत, चामड्याचे उद्योग, वस्त्रोद्योग, वाहन उद्योग, विविध उद्योगांमधील उत्पादन हे सर्व संपले असल्याचा हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. प्रयागराजमध्ये छात्रों की गुंज कार्यक्रमाला बिहार आणि उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
पण तुम्हाला एक रुपयासुद्धा देणार नाहीत
राहुल गांधी म्हणाले की, दुसरं दार आहे उद्योजकतेचं,ज्याला 'स्टार्टअप इंडिया' म्हटले जात होते. स्टार्टअप इंडियामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना बँकेचे कर्ज, छोट्या व्यवसायांना बँकेचे कर्ज आणि आर्थिक सहाय्य. भारतीय बँका तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना एक रुपयासुद्धा कधीच देणार नाहीत. त्या अंबानी आणि अदानींना लाखो-कोटी रुपये देतील, पण तुम्हाला एक रुपयासुद्धा देणार नाहीत. 90 टक्के लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना बँकेकडून कर्ज मिळत नाही. उद्योजकतेचा दरवाजा बंद झाला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, तिसरा दरवाजा, ज्याला आपण सरकारी नोकऱ्या म्हणतो, जिथे तुम्हाला पेपरफुटीचा सामना करावा लागतो. त्या दरवाज्यातून 150 तरुणांपैकी फक्त 1 जणच पुढे जाऊ शकतो. जर 150 तरुणांनी परीक्षा देऊन सरकारी नोकरी मागितली, तर त्यापैकी फक्त 1 जण निवडला जातो.
त्यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्र, जे 10 वर्षांपूर्वी 14 लाख तरुणांना रोजगार देत असे त्या सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण झाले आहे. सार्वजनिक शाळा बंद झाल्या आहेत, सार्वजनिक रुग्णालये बंद झाली आहेत, कंपन्या विकल्या गेल्या आहेत, बीएसएनएल विकली गेली आहे, आणि अशाच प्रकारच्या इतर कंपन्याही विकल्या गेल्या आहेत बंदरे, विमानतळे सर्व अदानींच्या हवाली करण्यात आले आहे. म्हणूनच सार्वजनिक क्षेत्र बंद झाले आहे. तुमची शेवटची आशा होती, कॉर्पोरेट नोकऱ्या, आयटी, बॅक ऑफिस, ट्रान्सक्रिप्शन, सॉफ्टवेअर, जे पूर्वी भारतातील तरुणांना रोजगार देत होते तो दरवाजा तुमचा डेटा वापरून, एआय वापरून बंद केला जात आहे. तुमच्यासाठी पाचही दरवाजे बंद झाले आहेत, आणि म्हणूनच तुम्ही प्रचंड वेदना सहन करत आहात.
मोदी तुमचे लक्ष विचलित करतात
राहुल गांधी म्हणाले की, मी व्यवस्थेबद्दल बोलत आहे. ही व्यवस्था काय आहे? आणि ती कोण चालवते? तुमच्या वेदना, तुमचा डेटा आणि त्यांची संपत्ती आहे. अदानींचे उत्पन्न 10 वर्षांत 30 पटींनी वाढले आहे. ते एकेकाळी जागतिक श्रीमंतांच्या यादीत 600व्या क्रमांकावर होते आणि आता 10 वर्षांत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. भाजपची बँक शिल्लक 150 कोटी रुपये होती, आज ती 10 हजार कोटी रुपये आहे. मोदी तुमचे लक्ष विचलित करतात आणि राजकीय व्यवस्था चालवतात. मतचोरी. हे घडतं, ब्राझीलच्या महिलांचा मतदार यादीत समावेश केला जातो. त्यांनी सांगितले की, अलाहाबाद विद्यापीठात आरएसएसचे कुलगुरू बसवून करण्यात आलं आहे. प्रत्येक संस्थेत नोकरशाहीत प्रचारक, सैन्यात प्रचारक, प्रसारमाध्यमांमध्ये प्रचारक, न्यायपालिकेत प्रचारक, निमलष्करी दलात प्रचारक, विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्रचारक! हीच ती व्यवस्था आहे जी मोहन भागवत, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि अदानी चालवत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. या व्यवस्थेने नोकऱ्या नष्ट केल्या आहेत, या व्यवस्थेने विद्यापीठे ताब्यात घेतली आहेत, या व्यवस्थेने तुमच्यावर हल्ला केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक





















