एक्स्प्लोर

#MeToo : गायिका सोना मोहापात्राचे कैलाश खेरवर गैरवर्तनाचे आरोप

कैलाश खेर यांनी माझ्या मांडीवर हात ठेवला. बरं झालं, एखाद्या अभिनेत्याऐवजी तू संगीतकाराला (राम संपत) जोडीदार म्हणून लाभलीस, असा आरोप सोना मोहापात्राने केला आहे

मुंबई : देशभरात #MeToo चळवळ वेगाने पसरत असून अनेक महिला आपल्यावर झालेल्या अत्याचारांविरोधात मोठ्या हिमतीने आवाज उठवताना दिसत आहेत. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सोना मोहापात्राने दिग्गज गायक कैलाश खेर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. सोनाने तीन ट्वीट्समधून कैलाश खेर यांनी केलेल्या गैरवर्तनाची हकिगत सांगितली आहे. 'मुंबईत एका कॅफेमध्ये कॉन्सर्टविषयी बोलण्यासाठी आम्ही भेटलो. त्यावेळी कैलाश यांनी माझ्या मांडीवर हात ठेवला. बरं झालं, एखाद्या अभिनेत्याऐवजी तू संगीतकाराला (राम संपत) जोडीदार म्हणून लाभलीस, असं कैलाश खेर म्हणताच मी तात्काळ निघून गेले. पण त्यांना फरक पडला नाही' असा दावा सोनाने केला आहे. ढाका विमानतळावर उतरल्यावर मी त्यांचा फोन घेतल नव्हते. तेव्हा आयोजकांना फोन करुन त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. साऊंड चेक रद्द करुन त्याऐवजी माझ्यासोबत वेळ घालवण्याचा प्रस्तावही त्यांनी ठेवला, असं सोनाने लिहिलं आहे. 'किती महिलांची माफी मागाल? आता सुरुवात केली, तर आयुष्य कमी पडेल' असा खोचक टोलाही तिने लगावला. सोनाव्यतिरिक्त आणखी काही महिलांनीही कैलाश खेर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. खेर यांच्या घरी मुलाखतीसाठी गेलेलं असताना त्यांनी असभ्य वर्तन केल्याचा दावा एका पत्रकार महिलेने केला होता. तर कैलाश खेर यांनी कोलकात्यातील आपल्या हॉस्टेल रुममध्ये येण्यासाठी वारंवार आग्रह केल्याचा दावाही एका तरुणीने केला आहे. #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. लेखिका विनिता नंदा यांनी फेसबुक पोस्ट लिहून आरोप केले आहेत. तर अभिनेत्री तनुश्री दत्ता, पूजा भट्ट, कंगना रनौत, विनिता नंदा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ  यांच्यापासून दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर, गायक कैलाश खेर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत. #MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

व्हिडीओ

Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
Devendra Fadnavis : जेवढं मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी केलं, ते महाराष्ट्रातील इतर सरकारांकडून झालं असं वाटत नाही : देवेंद्र फडणवीस
कर्जमाफी, पार्थ पवारांची भेट ते मनोज जरांगेंचं आंदोलन, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
Embed widget