Singham Again Box Office Collection: 'सिंघम अगेन'ची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच; पाचव्या दिवशी 150 कोटींचा टप्पा पार
Singham Again Box Office Collection: 'सिंघम अगेन'नं बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. मात्र, रिलीजच्या पाचव्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचं पाहायला मिळालं.
Singham Again Box Office Collection Day 5: अजय देवगणचा (Ajay Devgan) चित्रपट 'सिंघम अगेन' (Singham Again) बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कमाई करत आहे. दिवाळीत बॉक्स ऑफिसवर धमाका करण्याची अपेक्षा सर्वांनाच या चित्रपटाकडून होती, त्यासाठी जोडीला चित्रपटात तगडी स्टारकास्टही होती. ज्याची अपेक्षा होती तेच घडलं, 'सिंघम अगेन' चित्रपटाला पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग मिळाली आणि अजय देवगणच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा ओपनर ठरला. यानंतर या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये 100 कोटींचा गल्ला पार केला. पण नव्या आठवड्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मात्र, चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळालं. मग, 'सिंघम अगेन'नं नेमकं रिलीजच्या पाचव्या दिवशी किती कलेक्शन केलं?
'सिंघम अगेन'नं पाचव्या दिवशी किती कमाई केली?
'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगणनं पुन्हा एकदा बाजीराव सिंघमच्या भूमिकेत कमबॅक केलं आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसारखे स्टार्स आहेत. या चित्रपटात सलमान खाननं चुलबुल पांडेच्या भूमिकेत कॅमिओही केला आहे. या ॲक्शन थ्रिलरची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ओपनिंग वीकेंडला चित्रपटानं मोठी कमाई केली होती. पण, नव्या आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसांत कमाई कमी होत आहे. दरम्यान, हे सहसा कोणत्याही चित्रपटांसोबत वीकडेजमध्ये होतं. असं असतानाही 'सिंघम अगेन'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा आकडा पार केला आहे.
चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर 'सिंघम अगेन'नं पहिल्या दिवशी 43.5 कोटी, दुसऱ्या दिवशी 42.5 कोटी, तिसऱ्या दिवशी 35.75 कोटी आणि चौथ्या दिवशी 18 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पाचव्या दिवसाच्या म्हणजेच, पहिल्या मंगळवारच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे आले आहेत.
Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सिंघम अगेन' ने रिलीजच्या पाचव्या दिवशी 13.50 कोटी रुपये कमवले आहेत. यासह, 'सिंघम अगेन'चे पाच दिवसांचे एकूण कलेक्शन 153.25 कोटींवर पोहोचलं आहे.
'सिंघम अगेन' बजेट वसूल करण्यापासून किती दूर आहे?
'सिंघम अगेन'नं बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. रिलीजच्या चार दिवसांत या चित्रपटानं 150 कोटींहून अधिक कमाई केली असून जगभरात 200 कोटींचा आकडा पार केला आहे. मात्र, 350 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट अजूनही बजेट वसूल करण्यापासून दूर आहे. तसेच, विकडेजमध्ये त्याची कमाई देखील कमी होत आहे. आता 'सिंघम अगेन' दुसऱ्या वीकेंडपर्यंत त्याची किंमत वसूल करण्यास सक्षम आहे की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.