![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Abhishek Bachchan : 'पुरुष धोकेबाज असल्याचा आरोप कायमच होतो', अभिषेक बच्चन असं का म्हटलं होतं?
Abhishek Bachchan Thoughts on Loyalty and Commitment: सिमी ग्रेवालने अभिषेक बच्चनचा एक जुना व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो आपल्या जोडीदाराविषयी बोलताना दिसतोय.
![Abhishek Bachchan : 'पुरुष धोकेबाज असल्याचा आरोप कायमच होतो', अभिषेक बच्चन असं का म्हटलं होतं? Simi Garewal defends Abhishek Bachchan amidst rumours of his divorce with Aishwarya Rai Bachchan and link-up rumours with Nimrat Kaur Abhishek Bachchan : 'पुरुष धोकेबाज असल्याचा आरोप कायमच होतो', अभिषेक बच्चन असं का म्हटलं होतं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/04/774989a5d80ad52edba64a22942f78511730725011268720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Abhishek Bachchan Talking About Relation: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांचं वैयक्तिक आयुष्य सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या बरेच चर्चेत आहेत. त्यातच अभिषेकच्या अभिनेत्री आणि त्याची सहकलाकार निम्रत कौरसोबतच्या अफेअरच्याही चर्चा सुरु आहेत. त्यातच आता सोशल मीडियावर अभिषेकचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
सिमी ग्रेवालने तिच्या कार्यक्रमाची एक जुनी क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक नातेसंबंधांमधील बांधिलकी आणि विश्वास यावर भाष्य करताना दिसत आहे. सध्या बच्चन कुटुंबाविषयी सुरु असलेल्या चर्चांदरम्यान त्यांची बाजू सावरण्यासाठी सिमीने या हा व्हिडीओ शेअर केल्याचं म्हटलं जातंय.
अभिषेकने काय म्हटलं?
सिमी ग्रेवालने शेअर केलेली क्लिप तिचा लोकप्रिय कार्यक्रम "Rondeevu with Simi Grewal" मधील आहे. या कार्यक्रमात 2003 मध्ये अभिषेक बच्चन दिसला होता. त्याने म्हटलं होतं की, "मला जुन्या पद्धतीचा म्हणा, पण मला साधं सरळं राहणीमानात जगण्यास काहीही अडचण नाही. मज्जा करायची इच्छा असलेल्या लोकांशीही मला काहीही अडचण नाही. त्यांनी नक्कीच त्यांना हव्या गोष्टींचा आनंद घ्यावा... पण जर तुम्ही कोणत्याही स्तरावर वचनबद्धता केली असेल तर त्या वचनबद्धतेचे पालन करा, अन्यथा, ते करू नका.
पुढे अभिषेकने म्हटलं की, माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला एक पुरुष म्हणून असं वाटतं की, जर तुम्ही तुम्ही एखाद्या स्त्रीसोबत वचनबद्ध असाल आणि जरी तिच्या प्रियकरासोबत सामना झाला तरी तुमचा तिच्यावर विश्वास असायला हवा. कारण पुरुषांवर कायमच धोकेबाज असल्याचा आरोप केला जातो, ही गोष्टच मला मुळात समजत नाही आणि याचा मला रागही येतो.
सोशल मीडिया पोस्टवर सिमी ग्रेवालला आला राग
सिमीने यापूर्वी एका सोशल मीडिया पोस्टवर टीका केली होती. ज्यामध्ये अमतिभ यांनी त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदासाठी ऐश्वर्याकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप करण्यात आला होता. या व्हिडीओवर सिमीने म्हटलं होतं की, खरी परिस्थिती समजून न घेता बच्चन कुटुंबाबाबत निराधार कमेंट करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ऐश्वर्या रायने 1 नोव्हेंबरला तिचा 51 वा वाढदिवस साजरा केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बच्चन कुटुंबाने अभिनेत्रीला शुभेच्छा देण्यासाठी कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. याआधी जुलैमध्ये ऐश्वर्या रायने अनंत अंबानींच्या लग्नात मुलगी आराध्यासोबत एकटीच हजेरी लावली होती. बिग बी पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता, जावई आणि मुलगा अभिषेकसोबत आले होते.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)