(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shweta Tiwari : वयाच्या 18 व्या वर्षी लग्न, 20 व्या वर्षी दिला बाळाला जन्म; दोनदा झालाय घटस्फोट; श्वेता तिवारीचं फिल्मी आयुष्य
Bollywood Actress : श्वेता तिवारी (Shweta Tiwari) बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'कसौटी जिंदगी के' (Kasautii Zindagii Kay) या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. व्यावसायिक आयुष्यासह अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्यदेखील खूप नाट्यमय आहे.
Shweta Tiwari Marriage : बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री व्यावसायिक कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे चांगल्याच चर्चेत असतात. व्यावसायिक कामात चांगल यश मिळत असलं तरी यातील काही अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यात मात्र अयशस्वी झालेल्या आहेत. बॉलिवूडची एक अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली असतानाही तिला आजही संघर्ष करावा लागत आहे. सतत संघर्ष करत असल्याने अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यात मात्र एकटी पडली आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आहे.
'कसौटी जिंदगी की'ने दिली ओळख
श्वेता तिवारी 'कसौटी जिंदगी की' (Kasautii Zindagi Kay) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली आहे. मालिकेत तिने प्रेरणाची भूमिका साकारली होती. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेच्या माध्यमातून ओळख मिळाली असली तरी वयाच्या 12 व्या वर्षी तिने पहिल्यांदा कॅमेरा फेस केला आहे.
चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्याआधी श्वेता तिवारीला भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये चांगलीच ओळख मिळाली आहे. भोजपुरी इंडस्ट्रीत काम करताना श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांच्यातील जवळीक वाढली. पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रेमासाठी तिने आपलं करिअर वाऱ्यावर सोडलं.
18 व्या वर्षी केलं लग्न
श्वेता तिवारी वयाच्या 18 व्या वर्षी राजा चौधरीसोबत लग्नबंधनात अडकली. त्यावेळी तिचं कुटुंब तिच्या निर्णयाविरोधात होतं. पण तरीही कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिने राजा चौधरीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दोन वर्षानंतर श्वेता तिवारीने आपली लेक पलक तिवारीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांच्यात दुरावा आला. लग्नाच्या 9 वर्षानंतर श्वेता आणि राजा यांचा घटस्फोट झाला. 2007 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर श्वेताने एकटीनेच आपल्या लेकीचा सांभाळ केला. पुढे तिच्या आयुष्यात 2012 मध्ये अभिनव कोहलीची एन्ट्री झाली. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनवसोबत दुसरं लग्न केल्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. 2019 मध्ये ती दुसऱ्या पतीपासूनही विभक्त झाली. श्वेता तिवारी आता आपल्या दोन्ही मुलांचा एकटीच सांभाळ करत आहे.
View this post on Instagram
श्वेता तिवारी आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतीच रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली. आता अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या