(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shweta Tiwari Apologies : अखेर ‘त्या’ वक्तव्यावर श्वेता तिवारीचे स्पष्टीकरण, लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल मागितली माफी
Shweta Tiwari Controversy : श्वेता तिवारीने आपल्या वक्तव्याद्वारे म्हटले आहे की, ‘माझ्या बोलण्याने किंवा माझ्या कृतीने, कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पण तरीही मी नकळत लोकांना दुखावले आहे. त्यामुळे मी सर्वांची माफी मागते.’
Shweta Tiwari : भोपाळमध्ये आपल्या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानावर आता अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) मौन सोडले. एबीपी न्यूजला दिलेल्या निवेदनात तिने या संपूर्ण प्रकरणावर बोलताना म्हटले की, तिच्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे.
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने एका निवेदनाद्वारे म्हटले की, ‘माझ्या लक्षात आले आहे की, माझ्या एका सहकाऱ्याशी संबंधित माझ्या विधानाचा हवाला देत, विपर्यास करून ते मांडले गेले आहे आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. नीट पाहिल्यास लक्षात येईल की, सौरभ राज जैन यांनी साकारलेल्या देवाच्या लोकप्रिय पात्रासाठी मी 'भगवान' हा शब्द वापरला आहे. लोक अनेकदा एखाद्या अभिनेत्याचे नाव त्याच्या पात्राशी जोडतात आणि अशा परिस्थितीत मी माध्यमांशी संवाद साधताना हेच उदाहरण वापरून बोलले होते.’
मी देखील देवभक्त!
श्वेता तिवारी पुढे म्हणाली की, ‘पण माझ्या विधानाचा गैरवापर करण्यात आला, हे खूप खेदजनक आहे. माझी स्वतःची देवावर गाढ श्रद्धा आहे आणि एक भक्त म्हणून माझ्याकडून जाणूनबुजून किंवा इतर कोणत्याही प्रकारे असा प्रकार होणे शक्य नाही. नकळतसुद्धा एखाद्याच्या भावना दुखावणारे कृत्य मी करणार नाही.’
श्वेता तिवारीने आपल्या वक्तव्याद्वारे म्हटले आहे की, ‘माझ्या बोलण्याने किंवा माझ्या कृतीने, कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पण तरीही मी नकळत लोकांना दुखावले आहे. त्यामुळे मी सर्वांची माफी मागते.’
नेमकं प्रकरण काय?
श्वेताच्या एका नव्या वेब सीरिजच्या प्रमोशन भोपाळमध्ये सुरू आहे. तेव्हा श्वेता आणि या वेब सीरिजची संपूर्ण टीम या सीरिजच्या प्रमोशनसाठी हॉटल जाहान नूमा पॅलेजमध्ये आली होती. त्यावेळी सुरू असलेल्या एका चर्चा सत्रामध्ये श्वेतानं 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है' हे वादग्रस्त वक्तव्य केलं. भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. या वादामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपाळमधील श्यामला हिल्स पोलिस ठाण्यात श्वेता तिवारीविरुद्ध आयपीसी कलम 295 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या :
- Shweta Tiwari : श्वेता तिवारीचं अंतर्वस्त्रांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाली...
- Shweta Tiwari Controversy : हे सहन करणार नाही; श्वेता तिवारीच्या वक्तव्यावर भडकले मध्य प्रदेशचे गृहमंत्री
- Shweta Tiwari : श्वेता तिवारीने का केलं ‘ते’ विधान? पाहा होस्ट सलील आचार्य काय म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha