Shweta Tiwari: ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य श्वेता तिवारीला महागात पडणार! अभिनेत्री विरोधात FIR दाखल
FIR against Shweta Tiwari : श्वेतावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात येत आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळचे आयुक्त मकरंद देउस्कर यांना 24 तासांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
![Shweta Tiwari: ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य श्वेता तिवारीला महागात पडणार! अभिनेत्री विरोधात FIR दाखल FIR filed against actress Shweta Tiwari after her controversial statement Shweta Tiwari: ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य श्वेता तिवारीला महागात पडणार! अभिनेत्री विरोधात FIR दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/62f3513cd1c597e60aa7319b8c38de87_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shweta Tiwari Controversy : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता अडचणीत आली आहे. भोपाळमध्ये एका वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान तिने देवाचे नाव घेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपाळमधील श्यामला हिल्स पोलिस ठाण्यात श्वेता तिवारीविरुद्ध आयपीसी कलम 295 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्वेताच्या एका नव्या वेब सीरिजच्या प्रमोशन भोपाळमध्ये सुरू आहे. तेव्हा श्वेता आणि या वेब सीरिजची संपूर्ण टीम या सीरिजच्या प्रमोशनसाठी हॉटल जाहान नूमा पॅलेजमध्ये आली होती. त्यावेळी सुरू असलेल्या एका चर्चा सत्रामध्ये श्वेतानं 'मेरी ब्रा का साइज भगवान ले रहे है' हे वादग्रस्त वक्तव्य केलं. भोपाळमधील अनेक लोक श्वेताच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत.
श्वेताला ‘विनोद’ महागात पडणार!
श्वेतावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात येत आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळचे आयुक्त मकरंद देउस्कर यांना 24 तासांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
भोपाळचे पोलीस आयुक्त मकरंद देउस्कर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्हाला गृहमंत्र्यांकडून सूचना मिळाल्या आहेत. ही बाब आमच्या निदर्शनासही आली आहे. त्यावर काय कारवाई करता येईल, याचा तपास सुरू आहे. त्यानंतरच पुढील कारवाई करता येईल. फॅशनशी संबंधित वेब सीरिजच्या तयारी आणि प्रमोशनसाठी श्वेता 26 जानेवारीला प्रोडक्शन टीमसोबत भोपाळला आली होती.
भोपाळमधील प्लॅटिनम प्लाझा येथे संस्कृती बचाव मंचाने श्वेता तिवारीच्या छायाचित्रांसह पोस्टर्स जाळले. संस्कृती बचाव मंचचे मध्य प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी म्हणाले की, श्वेता तिवारीने ज्या प्रकारे देवाचा अपमान करून बेताल वक्तव्य केले आहे, त्यानंतर आम्ही वेब सीरिजचे चित्रीकरण भोपाळमध्ये होऊ देणार नाही. आम्ही गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना याविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची विनंती केली आहे. या वेब सीरिजच्या शूटिंगला भोपाळमध्ये परवानगी देऊ नये. चित्रपट दिग्दर्शक, चित्रपटातील नायक-नायिका यांनी देवी-देवतांचा अवमान करण्याचा ठेका घेतला आहे. हे सहन केले जाणार नाही. तसेच श्वेता तिवारी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे.
इतर बातम्या :
- Shweta Tiwari : श्वेता तिवारीचं अंतर्वस्त्रांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाली...
- Shweta Tiwari Controversy : हे सहन करणार नाही; श्वेता तिवारीच्या वक्तव्यावर भडकले मध्य प्रदेशचे गृहमंत्री
- Dharmaveer : ‘धर्मवीर’ चित्रपटात उलगडणार आनंद दिघे यांचा जीवनपट, मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)