(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shubman Gill Ridhima Pandit Relationship : 9 वर्षांनी लहान असलेल्या शुभमन गिलसोबत लग्नाची चर्चा, अभिनेत्रीने म्हटले, मला तो खूपच...
Shubman Gill Ridhima Pandit Relationship : टीम इंडियाचा प्रिन्स शुभमन गिल आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रिद्धीमा पंडित यांच्यात अफेअर सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. लग्नाच्या चर्चांवर रिद्धीमाने पुन्हा एकदा भाष्य केले असून शुभमनबाबत आपलं मत व्यक्त केले आहे.
Shubman Gill Ridhima Pandit Relationship : क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यातील प्रेम प्रकरणांची चर्चा होत असते. सध्या टीम इंडियाचा 'प्रिन्स' शुभमन गिल (Shubman Gill) आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रिद्धीमा पंडित (Ridhima Pandit) यांच्यात अफेअर सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. हे दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या लग्नाच्या चर्चांवर रिद्धीमाने पुन्हा एकदा भाष्य केले असून शुभमनबाबत आपलं मत व्यक्त केले आहे.
शुभमन कसा वाटतो? रिद्धीमाने सांगितले...
रिद्धीमा पंडित शुभमन गिलपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. या वर्षाअखेरीस हे दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. 'फिल्मीज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत रिद्धीमाने सांगितले की, एकतर मी शुभमनला ओळखत देखील नाही. तो एक चांगला खेळाडू आहे, एवढंच मला माहित आहे. मात्र, माझी आणि त्याची काही वैयक्तिक ओळख नसल्याचे रिद्धीमाने सांगितले. मला जर शुभमनला भेटण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच त्याच्या सोबत चर्चा करेल. शुभमन मला खूप म्हणजे खूपच क्यूट वाटत असल्याचे रिद्धीमाने यावेळी सांगितले.
डेटिंगच्या चर्चा म्हणजे पब्लिसिटी स्टंट तर नाही ना?
दरम्यान, या आधी रिद्धीमाने 'हिंदुस्थान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, आता मी अशा बातम्यांवर काय प्रतिक्रिया देऊ? जे खरं आहे ते मला माहित आहे. मी या मुद्याला अधिक महत्त्व देणार नाही. मीच अशा मुद्यांना महत्त्व दिलं तर तो वेडपणा ठरेल असे रिद्धीमाने म्हटले. पब्लिसिटी स्टंट करायचा होता तर मी बिग बॉस मध्ये गेली असती. मी त्या शोमध्ये राहूनच कोणाचेही नाव घेतले असते आणि पब्लिसिटी केली असती. पण, मला हे पसंत नसल्याचेही रिद्धीमाने सांगितले.
सारासोबतच्या रिलेशनशिपची चर्चा....
याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्यासोबतही शुभमन गिलचे नाव जोडले गेले होते. अभिनेत्री सारा अली खानने यावर भाष्य करताना हे या चर्चा निराधार असल्याचे म्हटले होते. तर, सारा तेंडुलकर अथवा सचिन तेंडुलकरने किंवा शुभमन गिलनेही कधीही कोणतेही भाष्य केले नाही.
रिद्धीमा पंडित कोण आहे?
रिद्धीमा पंडित छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रिद्धीमा बिग बॉस ओटीटीमध्येही दिसली आहे. रिद्धीमाने 'बहू हमारी रजनीकांत' आणि 'खतरा खतरा' यांसारख्या टेलिव्हिजन शोमध्ये काम केलं आहे. बहू हमारी रजनीकांत या टीव्ही मालिकेमध्ये तिने रोबोटची भूमिका साकारली होती, ज्यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. यानंतर ती ओटीटी बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही दिसली होती.