Shreyas Talpade Health : "10 मिनिटांसाठी त्याचं हृदय बंद पडलं होतं"; श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत बॉबी देओलची माहिती
Shreyas Talpade Health Update : हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अभिनेत्याच्या पत्नीने बॉबी देओलला (Bobby Deol) दिली आहे.
![Shreyas Talpade Health : Shreyas Talpade Health Update Bobby Deol says Shreyas Talpade heart stopped for 10 minutes Actor Share Details Marathi Actor Shreyas Talpade heart attack Marathi News Bollywood Entertainment Latest Update Shreyas Talpade Health :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/16/46e6e42e53200ce07d1a0c5668cbf4e11702689174423254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shreyas Talpade Health : मराठी सिनेसृष्टीचा लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) 14 डिसेंबर 2023 रोजी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. लगेचच त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. श्रेयस सध्या आयसीयूमध्ये (ICU) असून त्याची प्रकृती स्थिर आहे. बॉबी देओलने (Bobby Deol) चाहत्यांना श्रेयसच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
10 मिनिटांसाठी श्रेयसचं हृदय बंद पडलं होतं : बॉबी देओल
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसच्या प्रकृतीबद्दल बोलताना बॉबी देओल (Bobby Deol on Shreyas Talpade Health) म्हणाला,"श्रेयसची पत्नी दिप्ती तळपदेसोबत माझं बोलणं झालं आहे. पतीला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला मोठा धक्का बसला आहे. तब्बल 10 मिनिटांसाठी श्रेयसचं हृदय बंद पडलं होतं. पण त्याची प्रकृती आता स्थिर आहे. त्याची अँजिओप्लास्टीही झाली आहे. श्रेयसच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि तो घरी परतावा यासाठी प्रार्थना करा".
दिप्ती तळपदेचं चाहत्यांना भावनिक आवाहन
श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चिंता व्यक्त करत होते. दरम्यान अभिनेत्याची पत्नी दिप्ती तळपदेने चाहत्यांना भावनिक आवाहन केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने लिहिलं आहे,"तुमच्या शुभेच्छांबद्दल मी आभार व्यक्त करते. श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. श्रेयसवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही आभार. या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्हाला थोडा एकांत द्या. तुमच्या पाठिंबा हा आम्हा दोघांसाठी खूप महत्त्वाचा आहे". दिप्तीच्या पोस्टवर श्रेयस ठिक आहे हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, काळजी घ्या त्याची, चाहत्यांचं कायमच त्याच्यावर प्रेम करतात, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
श्रेयस तळपदेवर डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. वयाच्या 47 व्या वर्षी फिटनेसफ्रिक असणाऱ्या श्रेयसला हृहयविकाराचा झटका आला होता. सध्या तो 'वेलमक टू द जंगल' (Welcome to The Joungle) या सिनेमाचं शूटिंग करत आहे. त्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या
Shreyas Talpade Health Update : श्रेयसची प्रकृती सुधारतेय, तुमच्या शुभेच्छांची गरज आहेच, पण... : दिप्ती तळपदेचं चाहत्यांना भावनिक आवाहन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)