(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Showtime Teaser : करण जोहर करणार नेपोटिज्मवर भाष्य, 'शोटाइम'चा टीझर आऊट; नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत
Showtime Teaser : करण जोहरच्या (Karan Johar) 'शोटाइम' या वेबसीरिजचा टीझर आऊट करण्यात आला आहे.
Showtime Teaser Out : करण जोहर (Karan Johar) हा बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आहे. अनेकदा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. करणच्या आगामी 'शोटाइम' (Showtime) या वेबसीरिजचा टीझर आऊट करण्यात आला आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक ही सीरिज पाहू शकतात.
'शोटाइम' या सीरिजची पहिली झलक आता समोर आली आहे. नेपोटिज्म के मुखौटे के पीछे आखिरकर हर आऊटसायडर, इनसायडर बनना चाहता है आणि सिनेमा धंदा नही, धर्म है साड्डा, असे डायलॉग या सिनेमात आहेत.
'शोटाइम'चं कथानक काय आहे?
'शोटाइम' या सीरिजमध्ये इमरान हाशमी यांनी एका निर्मात्याची भूमिका साकारली आहे. हा निर्माता विक्ट्री स्टुडिओचा मालक आहे. इमरान हाशमीसह या सीरिजमध्ये मौनी रॉय, श्रिया सरन, अरमान मलिक, विजय राज, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाव आणि नसीरुद्दीन शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. टीझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना इंडस्ट्रीतील काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
View this post on Instagram
मिहिर देसाई आणि अर्चित कुमार यांनी 'शोटाइम' या सीरिजची निर्मिती केली आहे. सुमित रॉय, लारा लांदनी आणि मिथुन गंगोपाध्याय यांनी या सीरिजचं कथानक लिहिलं आहे. जेहन हांडा आणि करण श्रीकांत शर्मा यांनी खूपच दमदार संवाद लिहिले आहेत. आनंद भास्कर यांनी संगीत दिलं आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर ही सीरिज रिलीज होणार आहे.
नेपोटिज्मवर भाष्य करणारी 'शोटाइम'
करण जोहरला अनेकदा त्याच्या सिनेमांपेक्षा नेपोटिज्ममुळे ट्रोल केलं जातं. आता करणने आपल्या आगामी सीरिजमध्ये नेपोटिज्म या विषयावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. करण, इमरान हाशमी आणि मौनी रॉयच्या माध्यमातून प्रेक्षकांना नेपोटिज्ममधील सत्य पाहायला मिळणार आहे. याआधी करणने 'कॉफी विथ करण'मध्ये नेपोटिज्मवर भाष्य केलं होतं.
करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी 'शोटाइम' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. धमाकेदार ट्रेलर आऊट झाल्यामुळे आता सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
संबंधित बातम्या