एक्स्प्लोर

Shivrayancha Chhava : जय शिवराय! 'शिवरायांचा छावा'ने रिलीजच्या पहिल्या दिवशीच जमवला कोट्यवधींचा गल्ला; 400 पेक्षा जास्त थिएटर्स अन् 1200 पेक्षा अधिक शोज

Shivrayancha Chhava Box Office Collection Day 1 : 'शिवरायांचा छावा' हा ऐतिहासिक सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे.

Shivrayancha Chhava Box Office Collection : दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind), 'शेर शिवराज' (Sher Shivraj) आणि 'सुभेदार' (Subhedar) या सिनेमानंतर प्रेक्षक 'शिवरायांचा छावा' या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर आता हा सिनेमा प्रदर्शित झाला असून रिलीजच्या पहिल्या दिवशीच या सिनेमाने कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे.

'शिवरायांचा छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Shivrayancha Chhava Box Office Collectio Day 1)

'शिवरायांचा छावा' हा सिनेमा 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 0.5 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी आतापर्यंत या सिनेमाने 0.15 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 0.65 कोटींचा गल्ला जमवला आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे. आता हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

'शिवरायांचा छावा' 16 फेब्रुवारीला चित्रपटगृहात

शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला ।। या दोन ओळींतच खर्‍या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त होतो. छत्रपती संभाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी मृत्यूलाही ज्यांच्यासमोर ओशाळावं लागलं त्या हिमालयाएवढं कर्तुत्व असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना मनोमन नमन केलं जातं, अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती अणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्वराज्य रक्षणार्थ अनंत अत्याचार सोसत बलिदान देणाऱ्या या हिंदवी स्वराज्याच्या वाघाचा पराक्रमी इतिहास उलगडणारा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिकपट 16 फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल झाला आहे.    

स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाची  संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. आलेल्या संकटांवर पाय रोऊन उभे राहत छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार केला. 

तगडी स्टारकास्ट असलेला 'शिवरायांचा छावा'

छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य, हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात घडत आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्मधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण  शिवतरे,अमित देशमुख,  तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न  केतकर, अभिजीत श्वेतचंद्र,  ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे, दीप्ती लेले, सचिन भिल्लारे आदि कलाकारांच्या भूमिका ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात आहेत.  

'शिवरायांचा छावा' या सिनेमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.

संंबंधित बातम्या

Shivrayancha Chhava : 400 पेक्षा जास्त थिएटर्स अन् 1200 पेक्षा जास्त शोज्, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' आजपासून सिनेमागृहात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HSC SSC Result : बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, बोर्डाचं काम अंतिम टप्प्यात, दहावीचा निकाल कधी लागणार?
HSC SSC Result : दहावी बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, निकालाचं काम अंतिम टप्प्यात, जाणून घ्या अपडेट
Bollywood Actress : 7 सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेत्रीचा सिनेसृष्टीला रामराम; सुपरस्टारच्या भावाच्या प्रेमात वेडी झाली, मृत्यूचं गुढ आजही कायम
7 सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेत्रीचा सिनेसृष्टीला रामराम; सुपरस्टारच्या भावाच्या प्रेमात वेडी झाली, मृत्यूचं गुढ आजही कायम
Russia Bulava Missile: पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
Pune Aircraft : पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला; विमानाला टग ट्रकच्या धडकेत भगदाड पडलं, उड्डाण लगेच थांबवलं!
Pune Aircraft : पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला; विमानाला टग ट्रकच्या धडकेत भगदाड पडलं, उड्डाण लगेच थांबवलं!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 17 May 2024Ghatkoper Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग, भावेश भिंडेला अटकJayant Patil On Chhagan Bhujbal : लोकसभेवरून छगन भुजबळ नाराज? जयंत पाटील काय म्हणाले?Sanjay Raut Mumbai : लोकसभा निवडणुकीनंतर सुपारीचे दुकानं बंद होणार, राऊतांचा राज ठाकरेंवर घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSC SSC Result : बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, बोर्डाचं काम अंतिम टप्प्यात, दहावीचा निकाल कधी लागणार?
HSC SSC Result : दहावी बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, निकालाचं काम अंतिम टप्प्यात, जाणून घ्या अपडेट
Bollywood Actress : 7 सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेत्रीचा सिनेसृष्टीला रामराम; सुपरस्टारच्या भावाच्या प्रेमात वेडी झाली, मृत्यूचं गुढ आजही कायम
7 सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेत्रीचा सिनेसृष्टीला रामराम; सुपरस्टारच्या भावाच्या प्रेमात वेडी झाली, मृत्यूचं गुढ आजही कायम
Russia Bulava Missile: पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
Pune Aircraft : पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला; विमानाला टग ट्रकच्या धडकेत भगदाड पडलं, उड्डाण लगेच थांबवलं!
Pune Aircraft : पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला; विमानाला टग ट्रकच्या धडकेत भगदाड पडलं, उड्डाण लगेच थांबवलं!
Health : डेंग्यू आणि व्हायरल तापामध्ये फरक कसा ओळखाल? लक्षणं 'अशी' ओळखा, आरोग्य तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती 
Health : डेंग्यू आणि व्हायरल तापामध्ये फरक कसा ओळखाल? लक्षणं 'अशी' ओळखा, आरोग्य तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती 
Criminal Justice Season 4 : अ‍ॅड.. माधव मिश्रा येतोय...; 'क्रिमिनल जस्टिस'च्या चौथ्या सीझनची घोषणा
अ‍ॅड.. माधव मिश्रा येतोय...; 'क्रिमिनल जस्टिस'च्या चौथ्या सीझनची घोषणा, पंकज त्रिपाठी कोणत्या प्रकरणाचा सोडवणार गुंता?
Bhavesh Bhinde: ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
Malaika Arora : पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा
पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा
Embed widget