![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shinzo Abe Death : शिंजो आबेंच्या निधनावर अनुपम खेर यांनी व्यक्त केला शोक, केली भावनिक पोस्ट
Shinzo Abe : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनावर आता बॉलिवूडचे सुपरस्टार अनुपम खेर यांनी शोक व्यक्त केला आहे.
Anupam Kher On Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामुळे आता दिग्गजांकडून शोक व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहिली आहे.
शिंजो आबेंच्या निधनावर अनुपम खेरने व्यक्त केला शोक
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेअर करत शिंजो आबे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुपम खेर यांनी शिंजो आबेंचा फोटो शेअर करत भावनिक कॅप्शनदेखील लिहिली आहे.
View this post on Instagram
शिंजो आबेंच्या निधनानंतर अनुपम खेर यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे, "जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. शिंजो आबे यांची गणना चांगल्या नेत्यांच्या यादीत केली जाते. आता त्यांच्या निधनाने खूप दु:ख होत आहे."
नेमकं काय घडलं?
शिंजो आबे यांच्यावर भाषणादरम्यान गोळीबार करण्यात आला होता. पश्चिम जपानमध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं भाषण सुरु होतं. यावेळी ते अचानक खाली कोसळले. त्यावेळी शिंजो आबे जखमी अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आलं. तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
संबंधित बातम्या
Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या, गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू
Shinzo Abe Death Japan Ex PM : शिंजो आबेंच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी गहिवरले, भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)