![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shinzo Abe Death Japan Ex PM : शिंजो आबेंच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी गहिवरले, भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Shinzo Abe Death Japan Ex PM : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटरवर श्रद्धांजली वाहिली.
![Shinzo Abe Death Japan Ex PM : शिंजो आबेंच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी गहिवरले, भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर PM modi expresses shock and sadness at the tragic demise of Former Japanese PM Abe Shinzo Shinzo Abe Death Japan Ex PM : शिंजो आबेंच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी गहिवरले, भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/08/d8c90886baa987842eacd9c41e36028a1657280318_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shinzo Abe Death Japan Ex PM: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) ट्वीटरवर श्रद्धांजली वाहिली. आबेंच्या निधनानंतर मोदी गहिवरले. शिंजो आबे यांच्यावरचा हल्ला धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्य एका ट्विटद्वारे देशभरात उद्या (9 जुलै) एक दिवसाचा राष्ट्री दुखवटाही जाहीर केला आहे.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांचे शुक्रवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. आबे यांच्या निधनानंतर जगभरातील प्रमुख नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांना ट्विटरवर श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिंजो आबे यांची मैत्री जगजाहीर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकापाठोपाठ एक ट्विट केले आहेत. एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंजो आबे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केलाय. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरचा हल्ला धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. "माझे प्रिय मित्र अॅबे शिंजो यांच्यावर झालेल्या हल्ल्याने तीव्र दु:ख झाले. आम्ही आणि आमच्या प्रार्थना शिंजो आबे, त्यांचे कुटुंबिय आणि जपानच्या नागरिकांसोबत आहेत, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Sharing a picture from my most recent meeting with my dear friend, Shinzo Abe in Tokyo. Always passionate about strengthening India-Japan ties, he had just taken over as the Chairman of the Japan-India Association. pic.twitter.com/Mw2nR1bIGz
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2022
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“माझ्या सर्वात प्रिय मित्रांपैकी एक शिन्झो आबे यांच्या दुर्दैवी निधनाने मला धक्का बसला असून झालेले दुःख शब्दांपलीकडे आहे.ते एक जागतिक पातळीवरचे उत्तुंग राजकारणी व्यक्तिमत्व , एक उत्कृष्ट नेता आणि एक उल्लेखनीय प्रशासक होते. जपान आणि जगाला एका उत्तम स्तरावर पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले.'' माझा आबे यांच्यासोबतचा स्नेहबंध अनेक वर्षांचा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना माझी त्यांच्याशी ओळख झाली होती आणि मी पंतप्रधान झाल्यानंतरही आमची मैत्री कायम राहिली.अर्थव्यवस्थेबद्दल आणि जागतिक घडामोडींबद्दल त्यांना असलेल्या तीक्ष्ण अंतर्दृष्टीने माझ्यावर नेहमीच सखोल छाप पाडली.'' “माझ्या अलीकडच्या जपान दौऱ्यादरम्यान, मला आबे यांना पुन्हा भेटण्याची आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. त्यावेळी नेहमीप्रमाणेच ते हास्यविनोद करत मनमोकळेपणाने बोलत होते आणि बारकाईने ऐकत होते. ही आमची शेवटची भेट असेल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांचे कुटुंबीय आणि जपानी लोकांप्रती माझ्या मनापासून संवेदना.'' “भारत-जपान संबंधांना विशेष धोरणात्मक आणि जागतिक सहकार्याच्या स्तरावर नेण्यासाठी आबे यांनी मोठे योगदान दिले.आज संपूर्ण भारत जपानसोबत शोकसागरात बुडाला आहे आणि या कठीण प्रसंगी आम्ही आमच्या जपानी बंधू-भगिनींसोबत एकजुटीने उभे आहोत.” माजी पंतप्रधान शिन्झो आबे यांच्याबद्दल मनापासून आदर व्यक्त करण्यासाठी, 9 जुलै 2022 रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येईल." “माझा प्रिय मित्र शिन्झो आबेसोबतच्या माझ्या सर्वात अलीकडील टोक्योमधील भेटीतील एक छायाचित्र सामायिक करत आहे. भारत-जपान संबंध बळकट करण्यासाठी नेहमीच उत्साही असलेल्या त्यांनी नुकतेच जपान-भारत संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले होते.''
संबंधित बातम्या :
Trending News : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भर रस्त्यात गोळीबार, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Shinzo Abe : कोण आहेत शिंजो आबे? स्टील प्लांटमध्ये नोकरी ते देशाचे पंतप्रधान; जबरदस्त जीवनप्रवास!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)