Shilpa Shetty : प्रत्येक 'स्त्री'ची गोष्ट सांगणारा शिल्पा शेट्टीचा 'सुखी'; 'या' दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Sukhee : शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) आगामी 'सुखी' या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे.
Shilpa Shetty Sukhee Poster Out : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या सुखी' (Sukhee) या सिनेमाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. आता या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे. या पोस्टरने चाहत्यांसह नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिल्पा शेट्टीने आजवर विविध विषयांवर भाष्य करणारे, वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. आता अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
शिल्पा शेट्टीने शेअर केलं 'सुखी'चं पोस्टर (Shilpa Shetty Shared Sukhee Movie Poster)
'सुखी' या सिनेमाचं लक्षवेधी पोस्टर शिल्पा शेट्टीने शेअर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत तिने लिहिलं आहे,"ही गोष्ट आहे माझी..तुमची आणि आपल्या सर्वांची. तुमच्यासारख्याच कालरा म्हणजे सुखीला नक्की भेटा...22 सप्टेंबरला जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार "सुखी". 'सुखी' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
'सुखी' या सिनेमाच्या माध्यमातून नव्या रुपात मनोरंजन करण्यासाठी शिल्पा शेट्टी सज्ज आहे. सोनल जोशीने (Sonal Joshi) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात शिल्पा शेट्टीसह कुशा कपिला, दिलनाज इराणी, पावलीन गुजराल, चैतन्य चौधरी आणि अमित साध महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राधिका आनंदने या बहुचर्चित सिनेमाची कथा लिहिली आहे.
'सुखी' या सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार?
'सुखी' हा 38 वर्षीय पंजाबी गृहिणी 'सुखी' अर्थात कालरा आणि तिच्या मैत्रिणींची गोष्ट सांगणारा आहे. कालरा आणि तिच्या मैत्रिणी 20 वर्षांनंतर त्यांच्या शाळेच्या रियुनियन करण्यासाठी दिल्लीला जातात. 'सुखी' ही प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे. एका स्त्रीच्या आयुष्यातील नाजूक गोष्टींना स्पर्श करणारा हा सिनेमा असेल. स्त्री ते आई होण्यापर्यंतचा 'सुखी'चा प्रवास प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करेल.
'सुखी' कधी होणार रिलीज? (Sukhee Release Date)
'सुखी' हा सिनेमा 22 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शिका सोनल जोशी यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. शेरनी, छोरी आणि जलसा, टी-सीरीज आणि अबंडंटिया एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. जगभरातील सिनेमागृहात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सुखीच्या जगात घेऊन जाणाऱ्या या सिनेमाच्या नव्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
'सुखी' या सिनेमाचं याआधीदेखील एक पोस्टर आऊट करण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये शिल्पाने हातात पाकीट, घड्याळासह काही घरगूती गोष्टी पकडल्या दिसून आल्या. 'सुखी' हा स्त्रीप्रधान सिनेमा असणार आहे. एकीकडे 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. महिलांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला आहे. दरम्यान आता 'सुखी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
संबंधित बातम्या