Shehnaaz Gill : "पुन्हा भेटेन"; Sidharth Shukla च्या 'बर्थ-डे' निमित्त शहनाज गिलची भावनिक पोस्ट
Sidharth Shukla Birthday : शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला बर्थ-डे निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
Shehnaaz Gill Celebrating Sidharth Shukla Birthday : दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा (Sidharth Shukla) आज वाढदिवस आहे. सिद्धार्थच्या आठवणीत शहनाज गिल (Shehnaaz Gill) भावूक झाली आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने सिद्धार्थला बर्थ-डे निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
शहनाजच्या हृदयस्पर्शी पोस्टने चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. शहनाजने सिद्धार्थचा एक हसणारा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"मी तुला पुन्हा भेटेन...12.12". शहनाजच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत सिद्धार्थला बर्थ-डे निमित्त शुभेच्छा देत आहेत.
शहनाज गिलने सिद्धार्थसाठी फक्त खास पोस्टच लिहिली नाही. तर तिने त्याच्या नावाने केकदेखील कापला आहे. सोशल मीडियावर तिने बर्थ-डे सेलिब्रेशनची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तसेच सिद्धार्थसोबतचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.
View this post on Instagram
'बिग बॉस 13' मुळे सिद्धार्थ आणि शहनाजला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर 'सिडनाज' म्हणून त्यांची जोडी ओळखली जाऊ लागली. दोघांचं नातं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. पण 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचं निधन झालं आणि शहनाज एकटी पडली.
सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे एकटी पडली होती. पण आता सलमान खानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या