Shaktimaan Movie Updates : मु्केश खन्ना यांना मिळाला मोठ्या पडद्यावरील 'शक्तिमान'; कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या सगळं काही
Shaktimaan Movie Release Date : छोट्या पडद्यावरील या सुपरहिरोने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले होते. आजही शक्तिमानचे गारुड कायम आहे. आता हाच शक्तिमान रुपेरी पडद्यावर येणार आहे.
Shaktimaan Movie Updates : भारतातील छोट्या पडद्यावरील पहिला 'सुपरहिरो'असणाऱ्या शक्तिमानने (Shaktimaan) 90 च्या दशकातील मुलांवर आपली छाप सोडली होती. छोट्या पडद्यावरील या सुपरहिरोने (Super Hero) लोकप्रियतेचे उच्चांक गाठले होते. आजही शक्तिमानचे गारुड कायम आहे. आता हाच शक्तिमान रुपेरी पडद्यावर येणार आहे. टीव्हीवर शक्तिमानची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना (Mukesh Khanna) हे चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मुकेश खन्ना यांना आपल्या शक्तिमान चित्रपटाचा नायक मिळाला असून अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) शक्तिमानची भूमिका साकारणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगने पुढील दोन वर्षांच्या तारखा बुक केल्या आहेत. यामध्ये रणवीर सिंग 'डॉन 3' आणि 'शक्तिमान' या दोन चित्रपटांवर लक्ष केंद्रित करणार आहे. मागील काही वर्षांपासून शक्तिमान चित्रपटाची चर्चा सुरू आहे.
वर्ष 2022 मध्ये मुकेश खन्ना यांनी 'शक्तिमान' चित्रपटासाठी सोनी पिक्चर्स इंडियासोबत भागिदारी केली.त्यानंतर एक टीझरही रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये 'शक्तिमान'ची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून चाहत्यांना या चित्रपटाची प्रतीक्षा लागली आहे. मात्र, शक्तिमानची भूमिका कोण साकारणार हे निश्चित होऊ शकले नाही. पण आता याची पुष्टी झाली आहे. अभिनेता रणवीर सिंग आता शक्तिमान होणार आहे.
रणवीर सिंह होणार शक्तिमान आणि पंडित गंगाधर... Ranveer Singh In Shaktimaan
'पीपिंग मून'ने दिलेल्या वृ्त्तानुसार, रणवीर आता शक्तीमान आणि पंडित गंगाधर विद्याधरच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीर सिंगवर शक्तिमान साकारण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. मुकेश खन्ना यांनी 'शक्तिमान' आणि पंडित गंगाधर विद्याधर यांची भूमिका केली होती. देशाचा पहिला सुपरहिरो म्हटल्या जाणाऱ्या शक्तिमानची भूमिका त्यांनी अशा प्रकारे साकारली की त्यांच्या जागी दुसरा कोणताच अभिनेत्याची कल्पनाही करू शकत नाही. अशा परिस्थितीत शक्तीमान आणि विद्याधर यांच्या भूमिकांना न्याय देणे रणवीर सिंगसाठी आव्हानात्मक असणार आहे.
शक्तिमानचे दिग्दर्शन कोण करणार? ( Shaktimaan Movie Director )
'शक्तिमान'टीव्ही मालिका 1997 मध्ये दूरदर्शनवर सुरू झाली. ही मालिका 2005 पर्यंत सुरू होती. इतक्या वर्षांनंतरही या शोची फॅन फॉलोइंग चांगली आहे. 'शक्तिमान' या चित्रपटाचे दिग्दर्शन बासिल जोसेफ करणार आहेत. 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'मिनल मुरली' या मल्याळम सुपरहिरो चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. 'शक्तिमान'साठी, बेसिल जोसेफ 'मिनल मुरली'चे लेखक अरुण अनिरुधन आणि जस्टिन मॅथ्यू आणि 'गुलक' वेब सीरिजचे दुर्गेश सिंग यांच्यासोबत काम करणार आहेत.
शक्तिमान चित्रपट कधी होणार रिलीज? ( Shaktimaan Movie Release Date )
वर्ष 2024 च्या अखेरपर्यंत शक्तिमान चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण होईल. त्यानंतर चित्रपटाचे प्री-प्रोडक्शन सुरू होईल.सूत्रांच्या माहितीनुसार, 2025 मध्ये चित्रीकरण सुरू होईल आणि 2026 मध्ये शक्तिमान रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
तीन भागांमध्ये असणार चित्रपट, प्रत्येक भागाचे बजेट 300 कोटी
मुकेश खन्ना यांनी जून 2023 मध्ये त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले होते की शक्तिमानवर बनत असलेल्या चित्रपटाचे बजेट 200-300 कोटी असेल. ट्रायोलॉजी म्हणून हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आणला जाणार आहे. प्रत्येक भागासाठी सुमारे 300 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे वृत्त आहे.