एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'रईस' शाहरुखसाठी गर्दी, चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू
गांधीनगर : रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या अभिनेता शाहरुख खानला पाहण्यासाठी वडोदऱ्यात चाहत्यांची झुंबड उडाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत आपल्या बहिणीला सोडण्यास आलेल्या एका स्थानिक नेत्याला आपला जीव गमावावा लागला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव फरीद खान आहे. फरीद खान हा समाजवादी पक्षाचा स्थानिक नेता होता. यावेळी दोन पोलीसही जखमी झाले आहेत.
अभिनेता शाहरुख खान मुंबईहून दिल्लीला आपल्या रईस या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी चालला होता. रात्री 10.30 च्या सुमारास ही ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस वडोदरा स्थानकात दाखल झाली. मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला पाहण्यासाठी वडोदरा स्टेशनवर प्रचंड गर्दी उसळली. चाहत्यांनी रेल्वे ट्रॅकसह प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी केली होती.
रेल्वेच्या टपावर चढूनही चाहत्यांनी रेल्वे रोखून धरली होती. गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर धावपळ होवून चेंगराचेंगरी झाली.
शाहरुखनं व्यक्त केला शोक
"फरीदखान यांच्या मृत्यूच्या बातमीने मी दु:खी आहे. बडोद्यात असलेल्या क्रिकेटर इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांना फरीदखान पठाण यांच्या कुटुंबियांना पडेल ती मदत करण्याची विनंती मी केली आहे." असं शाहरुख खाननं सांगितलं आहे. तसंच शाहरुखनं फरीद खान यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
'रईस' च्या प्रमोशनसाठी शाहरुखचा रेल्वेप्रवास
अभिनेता शाहरुख खाननं चक्क ट्रेननं काल दिल्ली प्रवास सुरु केला होता. ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसनं काल संध्याकाळी शाहरुख दिल्लीच्या दिशेनं मार्गस्थ झाला होता. त्याच्या आगामी रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख हा ट्रेनचा प्रवास केला होता. यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री सनी लिओनही प्रवास करत होती.
इरफान खान आणि यूसुफ पठाण शाहरुखच्या भेटीला
क्रिकेटपटू इरफान खान आणि यूसुफ पठाण शाहरुखला भेटण्यासाठी वडोदरा स्टेशनवर आले होते. मात्र चाहत्यांच्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या फरीद खान यांच्या कुटुंबाला आणि जखमींना मदत करण्याची विनंती केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement