(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shahid Kapoor : मुलीचा जन्म झाल्यावर शाहिद कपूरने सासऱ्यांची मागितली होती माफी...
Shahid Kapoor : शाहिद कपूरने आपल्या मुलीचा जन्म झाल्यानंतर आपल्या सासऱ्यांना फोन करून त्यांची माफी मागितली असल्याचे म्हटले.
Shahid Kapoor : शाहिद कपूर (Shahid Kapoor) आपले वैयक्तिक आयुष्य लाइमलाइटपासून दूर ठेवतो. मात्र, लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. शाहिदच्या वाढदिवसाच्या यानिमित्ताने त्याची जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मुलाखतीत आपल्याला मुलगी झाल्यानंतर मीराचे वडील अर्थात सासऱ्यांना फोन करून माफी मागितली असल्याचे शाहिदने म्हटले.
25 फेब्रुवारी रोजी शाहिदने कपूरने आपला 42 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्याशी संबंधित जुने किस्से समोर आले.
View this post on Instagram
शाहिदच्या मनाची घालमेल
शाहिद कपूर हा दोन मुलांचा बाप आहे. मीरासोबत विवाहबद्ध झाल्याच्या एका वर्षानंतर 2016 मध्ये मीशाचा जन्म झाला. चित्रपट समीक्षक कोमल नहाटा यांना दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच बाप झाल्यानंतरचा अनुभव सांगितला. शाहिदने या मुलाखतीत सांगितले की, त्यावेळी मी खूप आनंदी होतो आणि घाबरलो होतो. वर्षभरापूर्वी माझे लग्न झाले होते. मुलगी झाल्यावर सगळ्यात आधी मीराच्या वडिलांना फोन केला आणि म्हणालो, 'बाबा, लग्नात माझ्या वागणुकीमुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर मला त्याबद्दल खेद वाटतो. मला माफ करा.
View this post on Instagram
शाहिदने का मागितली माफी?
शाहिदने सांगितले की, मी मुलीचा बाप आहे आणि एक दिवस तिचे लग्न होईल आणि कोणीतरी मुलगा तिच्यासोबत असेल. त्याच क्षणी पुढची 30 वर्षे माझ्या डोळ्यांसमोरून गेली. एका मुलीचा बाप होणे खूप खास असल्याचे त्याने सांगितले. मला आणि मीराला मुलगीच हवी होती असेही शाहिदने सांगितले.
शाहिद कपूर आणि कृती सेनन यांची भूमिका असलेला 'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली. त्याशिवाय, शाहिद 'फर्जी' या वेब सीरिजमधूनही ओटीटीवर झळकला होता.