Shahid Kapoor : 'तो' नकार अजूनही टोचतोय , शाहीद कपूरने सांगितली मनातील सल
Shahid Kapoor : सध्या रुपेरी पडद्यावर दमदार कामगिरी करणारा अभिनेता शाहिद कपूरच्या मनात सल आहे. ही सल त्याने एका मुलाखतीत बोलून दाखवली.
Shahid Kapoor : आपल्या आयुष्यात आपण दिलेले काही नकार अथवा होकार हे कायम लक्षात राहतात. या होकाराने अथवा नकाराची सल कायम राहते. सध्या रुपेरी पडद्यावर दमदार कामगिरी करणारा अभिनेता शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) मनात सल आहे. ही सल त्याने एका मुलाखतीत बोलून दाखवली. एका भूमिकेला नकार दिल्याची अजूनही सल असल्याचे शाहिद कपूरने सांगितले.
शाहिद कपूरला 'रंग दे बसंती' या चित्रपटातील ऑफर देण्यात आली होती. हा चित्रपट 2006 मध्ये ब्लॉकबस्टर ठरला होता. यामध्ये आमिर खान हा मुख्य भूमिकेत होता. त्याशिवाय, अतुल कुलकर्णी, आर. माधवन, सोहा अली खान, शर्मन जोशी, सिद्धार्थ आदी कलाकारांच्या भूमिका होत्या. यातील एका भूमिकेबाबत शाहिदला विचारणा करण्यात आली होती. मात्र, शाहिदने या भूमिकेलाच नकार दिला. एका मुलाखतीत शाहिदने या चित्रपटाला नकार दिल्याची सल अजूनही बोचत असल्याचे सांगितले.
शाहिदने का नाकारला 'रंग दे बसंती'?
नेहा धुपियाच्या एका टॉक शोच्या एपिसोडमध्ये अभिनेता शाहिद कपूरने हजेरी लावली होती. या चित्रपटात त्याला करण सिंघानियाची भूमिका ऑफर झाली होती. ही भूमिका शाहिदच्या नकारामुळे सिद्धार्थ याने साकारली होती. शाहिदने सांगितले की, ही भूमिका ऑफर झाली तेव्हा मी दुसऱ्या चित्रपटात व्यस्त होतो. त्यामुळे मी नकार दिला. मात्र, ज्यावेळी मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा डोळ्यात अश्रू आले. ही स्क्रिप्ट इतकी आवडली होती की, त्यावेळी माझ्याकडे दिलेल्या नकारावर पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. जर मी वेळ काढला असता तर कदाचित या सर्वोत्तम चित्रपटाचा भाग असतो, असे शाहिदने सांगितले.
View this post on Instagram
ओमप्रकाश मेहरा यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट
ओमप्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात संरक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, देशातील तरुणांच्या मनातील खदखद, देशातील धर्मांध पक्ष संघटना, सरकारकडून होणारी आंदोलकांवरील दडपशाही, तरुणांनी नाईलाजाने उचलले टोकाचे पाऊल अशा विविध मुद्यांवर भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या निमित्ताने मोठी चर्चा झडली गेली.
या चित्रपटात आमिर खान, अतुल कुलकर्णी, सोहा अली खान, शर्मन जोशी, आर. माधवन, कुणाल कपूर आदींच्या भूमिका होत्या.