Shah Rukh Khan : शाहरुखसमोर तासनतास रडत बसायची बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री; 17 वर्षांनी समोर आलं कारण
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसमोर बॉलिवूड अभिनेत्री फराह खान (Farah Khan) तासनतास रडत बसायची. आता 17 वर्षांनी यामागचं कारण समोर आलं आहे.
Shah Rukh Khan : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींचा मोठा मित्रपरिवार आहे. सुखाच्या क्षणांसह अडचणींच्यावेळीदेखील ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सिने अभिनेत्री, निर्माती आणि लेखिका फराह खान (Farah Khan) एकमेकांचे चांगले मित्र आहेत. फराह जेव्हा ट्रिप्लेट्सचा विचार करत होती तेव्हा तिच्या कुटुंबासह शाहरुखलादेखील ही गोष्ट माहिती होती. 'ओम शांती ओम' (Om Shanti Om) या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान प्रेग्नंट होत नसल्याने मी शाहरुखजवळ तासनतास रडत बसायचे. त्यावेळी त्याने मला खूप सांभाळून घेतलं, असं फराहने नुकतचं एका मुलाखतीत सांगितलं आहे.
IVF च्या मदतीने फराह खानने दिला बाळाला जन्म
फराह खान वयाच्या 40 व्या वर्षी आयव्हीएफच्या माध्यमातून आई झाली. या प्रोसेसदरम्यान तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. नोवा आयवीएफ फर्टिलिटी युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत फराहने स्वत: याबाबत खुलासा केला आहे. फराह खान म्हणाली,"नैसर्गिकरित्या आई होण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण त्यात मला यश येत नव्हते. पहिल्यांदा डॉक्टरकडे गेले तेव्हा मी प्रेग्नंट आहे, असं मला वाटत होतं. पण डॉक्टरांसमोर असतानाचा मला पाळी आली आणि मी शून्यात गेले. संपूर्ण रस्त्यात रडत-रडत मी घरी गेले. त्यावेळी शाहरुखसमोर तासनतास बसून मी रडत होते".
फराह पुढे म्हणाली,"त्यानंतरही एकदा मी डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर सेटवर गेले होते. त्यावेळी डॉक्टरांनी मला कॉल केला आणि मी प्रेग्नंट नसल्याचं सांगितलं. दरम्यान आम्ही एक विनोद सीन शूट करत होतो. पण काहीतरी गडबड असल्याचा शाहरुखला अंदाज आला आणि त्याने संपूर्ण यूनिटला ब्रेक दिला. मला त्याच्या व्हॅनिटीमध्ये घेऊन गेला. त्यावेळीही मी तासनतास त्याच्यासमोर बसून रडत होते".
फराह खानने 2008 मध्ये IVF च्या माध्यमातून वयाच्या 40 व्या वर्षी तीन मुलांना जन्म दिला आहे. जार, आन्या आणि दिवा अशी तिच्या तीन मुलांची नावे आहेत. फराह खान आणि शिरीष कुंदर 2004 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी त्यांच्या मुलांचं स्वागत केलं.
शाहरुखने दिलेलं स्पेशल गिफ्ट
फराह पुढे म्हणाली,"मी तीन मुलांना जन्म दिला तेव्हा मला भेटायला 30 लोक आले होते. त्या रुग्णालायत अनेक वर्षांनी मी एकत्र तीन मुलांना जन्म दिला होता. मी ज्यादिवशी बाळांना जन्म दिला त्याच दिवशी शाहरुख मला भेटायला रुग्णालयात आला होता. त्यावेळी शाहरुख एक फैंसी फ्रेम घेऊन आला होता. तर गौरी खानने (Gauri Khan) माझ्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
कोण आहे फराह खान? (Who is Farah Khan)
फराह खान बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शिका आहे. शाहरुख खानपासून ते शाकिरापर्यंत अनेकांना तिने नृत्याचं प्रशिक्षण दिलं आहे. आतापर्यंत तिने दिग्दर्शित केलेले चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'तो निकल पडी' या सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती.
संबंधित बातम्या