Shah Rukh Khan: पठाणच्या रिलीजआधी शाहरुखनं चाहत्यांना दिलं सरप्राइज; मन्नत बाहेरील व्हिडीओ शेअर करत म्हणाला, 'सॉरी पण...'
सध्या शाहरुख (Shah Rukh Khan) हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण (Pathaan) या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. नुकतच शाहरुखनं त्याच्या चाहत्यांनी सरप्राइज दिलं.
Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख हा सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला. सध्या शाहरुख हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. नुकतच शाहरुखनं त्याच्या चाहत्यांनी सरप्राइज दिलं. केवळ वाढदिवस किंवा खास दिवशी मन्नत या बंगल्याच्या बाहेर येऊन चाहत्यांना आपली झलक दाखवणाऱ्या शाहरुखनं आता पठाण रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी मन्नतच्या बाहेर येऊन आपल्या चाहत्यांना सरप्राइज दिलं. यावेळी शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मन्नत बाहेर गर्दी केली होती.
शाहरुखनं शेअर केला व्हिडीओ:
शाहरुखनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये शाहरुखच्या मन्नत बाहेर चाहत्यांची गर्दी दिसत आहे. या गर्दीमध्ये एक लाल गाडी थांबलेली दिसत आहे. या व्हिडीओला शाहरुखनं कॅप्शन दिलं, 'या प्रेमाबद्दल मी तुमचे आभार मानतो. सॉरी पण आशा करतो की, लाल गाडीवाल्यांनी सीट बेल्ट लावला असेल. आता आपण थिएटरमध्ये भेटूया, पठाणचं तिकीट बुक करा. ' शाहरुखनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पठाण हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी अनेक लोक करत होते. तसेच या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दीपिका पादुकोणनं परिधान केलेल्या बिकीनीच्या रंगाचा देखील अनेकांनी निषेध केला पण आता या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग पाहता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे.
पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: