एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : "तेरे बाप का राज हैं...?", नवख्या दिग्दर्शकावर भडकला शाहरुख खान; शूट सोडून थेट डायरेक्टरला मारायला धावला

Shah Rukh Khan-Aryan Khan OTT Debut : शाहरुख खान आणि आर्यन खान यांच्या नवीन शोचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये बापलेक एकत्र दिसत आहेत.

Shah Rukh Khan-Aryan Khan OTT Debut : बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान मुलगा आर्यन खानसोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सने शाहरुखचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शाहरुख एका नवख्या दिग्दर्शकावर भडकल्याचं दिसत आहे. हा नवखा दिग्दर्शक दुसरी कुणी नसून त्याचा मुलगा आर्यन खान आहे. नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या टीझरमध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खान खास भूमिकेत दिसत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने मनोरंजनाचा डोस कायम ठेवण्यासाठी नवीन शो आणला आहे. या शोमध्ये बापलेक शाहरुख-आर्यनची जोडी खास अंदाजात पाहायला मिळणार आहे.  नेटफ्लिक्स शाहरुख खान आणि आर्यन खान यांचा नवीन शो घेऊन येत आहे. या शोची पहिली झलक समोर आली आहे. 

शाहरुख खान लेक आर्यनसोबत करणार ओटीटी डेब्यू

नेटफ्लिक्सने शाहरुख खान आणि आर्यन खानच्या ओटीटी डेब्यूसाठी उत्तम मुहूर्त साधला आहे. नेटफ्लिक्स शाहरुख आणि आर्यनचा एक नवा शो घेऊन येत आहे. याची पहिली झलक नेटफ्लिक्सने शेअर केली आहे. नेटफ्लिक्सने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'बैड्*स ऑफ बॉलीवुड' शोची पहिली झलक शेअर केली आहे. यामध्ये कॅमेऱ्यासमोर शाहरुख खान आणि कॅमेऱ्यामागे आर्यन खान असं चित्र पाहायला मिळत आहे. हा शो अभिनेता शाहरुख खानचा ओटीटी डेब्यू असणार आहे, यासोबतच शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन खान या शोद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. या शोच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आर्यन खानच्या खांद्यावर असेल.

कसा असेल शो?

नेटफ्लिक्सच्या या नव्या शोचं नाव - The Ba***ds of Bollywood असं आहे. आता हा शो नेमका कशाबद्दल आणि कसा असणार आहे, हे सध्या एक गूढच आहे. टीझरमध्ये शाहरुख खान कॅमेऱ्यासमोर उभा राहून म्हणतोय, हा चित्रपट वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. पण कॅमेऱ्यामागे बसलेला दिग्दर्शक शाहरुखकडून वारंवार रिटेक मागतो. शेवटी शाहरुख रागावतो आणि म्हणतो, इथे तुझ्या वडिलांचं राज्य आहे का? यानंतर, स्क्रीनवर आर्यन खानचा चेहरा समोर येतो.

शोचा मजेदार टीझर समोर

वारंवार रिटेकमुळे कंटाळलेला शाहरुख स्वत:च्या मर्जीने अभिनय करतो पण, टीझरच्या शेवटी, आर्यन कॅमेरा रोल करायला विसरतो यामुळे शाहरुख रागावतो आणि आर्यनला मारण्यासाठी धावतो, ज्यामध्ये आर्यन स्वतःला वाचवण्यासाठी पळून जाताना दिसतो. दरम्यान, या शोसाठी शाहरुख खान सर्वात मोठा, सर्वात धाडसी असे शब्द वापरताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात हा शो एक ट्रॉप ट्रेंडिंग शो बनण्याची शक्यता आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Urmila Matondkar Birthday : एकेकाळी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री, पण गेल्या अनेक वर्षांपासून बेरोजगार, 'रंगीला गर्ल'च्या एका चुकीमुळे करिअर उद्धवस्त

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Nana Patekar Reason For Leaving Mumbai: नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO
नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget