एक्स्प्लोर

Shah Rukh Khan Tweet: 'पठाण'साठी सांगलीच्या तरुणांनी बुक केलं अख्खं ऑडिटोरियम; शाहरुखनं मानले आभार, म्हणाला...

पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी सांगली (Sangli) एसआरके युविव्हर्स या फॅन क्लबनं अख्खं ऑडिटोरियम बुक केलं आहे. 

Shah Rukh Khan Tweet: अभिनेता  शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अनेक शहरांमध्ये पठाणच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. शाहरुखचे चाहते पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग करत आहेत. सांगलीमधील (Sangli News) शाहरुखच्या काही चाहत्यांनी पठाण चित्रपटाच्या एका शोचं अॅडव्हान्स बुकिंग केलं आहे. पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी सांगली (Sangli) एसआरके युविव्हर्स या फॅन क्लबनं अख्खं ऑडिटोरियम बुक केलं आहे. 

एसआरके (SRK) वासिम या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये काही मुलं हातात पठाण चित्रपटाची तिकीटं घेऊन पठाणच्या पोस्टरसमोर थांबलेली दिसत आहेत. या ट्वीटला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं  आहे, "सर, प्लिज हे पाहा, आम्ही पूर्ण ऑडिटोरियम बूक केलं आहे. पठाण चित्रपट बघण्यासाठी सांगली एसआरके युविव्हर्स  तयार आहे.", या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, "थँक्यू आणि तुम्हाला हा चित्रपट आवडेल, अशी आशा बाळगतो."

शाहरुखचे चाहते आता पठाणच्या 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ची जय्यत तयारी करत आहेत. SRK युनिव्हर्स हा शाहरुखचा फॅन क्लब भारतातील 200 हून अधिक शहरांमध्ये 'पठाण'च्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे आयोजन करणार आहे.

पठाण हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी अनेक लोक करत होते. तसेच या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दीपिका पादुकोणनं परिधान केलेल्या बिकीनीच्या रंगाचा देखील अनेकांनी निषेध केला पण आता या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग पाहता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.  हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या:

Shah Rukh Khan Tweet: 'वाट पाहत होतो, आला का नाहीस?' मन्नत समोरील सेल्फी शेअर करत चाहत्याचा प्रश्न, शाहरुखच्या उत्तरानं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटकChanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीकाUddhav Thackeray On BJP : भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, उद्धव ठाकरेंचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Embed widget