Shah Rukh Khan Tweet: 'वाट पाहत होतो, आला का नाहीस?' मन्नत समोरील सेल्फी शेअर करत चाहत्याचा प्रश्न, शाहरुखच्या उत्तरानं वेधलं लक्ष
सध्या शाहरुख (Shah Rukh Khan) हा सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून पठाण (Pathaan) चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. शाहरुख ट्विटरवरील 'आस्क मी एनिथिंग सेशन'च्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतोय.
Shah Rukh Khan's Reply to Fan Waiting Outside Mannat: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला. सध्या शाहरुख हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. शाहरुख ट्विटरवरील आस्क मी एनिथिंग सेशनच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर पद्धतीनं उत्तरं देत आहे. काही चाहत्यांनी शाहरुखला हटके प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
नेटकऱ्यांचे मजेशीर प्रश्न
एका नेटकऱ्यानं शाहरुखच्या मन्नत या बंगल्यासमोरील फोटो शेअर करुन त्याला विचारले, "वाट पाहत होतो, तू आला का नाही?' या प्रश्नाला शाहरुखनं उत्तर दिलं, 'अरे, तेव्हा मी बेडवर चिल करत होतो.' तर दुसऱ्या युझरनं शाहरुखला प्रश्न विचारला, 'सर, तुम्ही कपिल शर्मामध्ये यावेळी येणार आहात का?' या प्रश्नाला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'भावा, मी आता चित्रपटगृहात येणार आहेत. तिथेच भेटूयात." शाहरुखच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
Feeling lazy want to chill in the bed yaar https://t.co/xN8qI2h9Ju
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 21, 2023
Bhai seedha movie hall mein aaoonga wahin milte hain….#Pathaan https://t.co/kIfnZa6YOa
— Shah Rukh Khan (@iamsrk) January 21, 2023
एका ट्विटर युझरनं शाहरुखला प्रश्न विचारला, "पठाणमध्ये किस करणार आहेस का?" या प्रश्नाचं शाहरुखनं उत्तर दिलं, "मी किस करणार नाही, तर किक मारणार आहे."
पठाण 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पठाण चित्रपटातील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. बेशरम रंग या गाण्यावरुन काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. या गाण्यात दीपिकानं परिधान केलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला होता.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Pathaan: बुर्ज खलिफावर झळकला शाहरुखच्या 'पठाण' चा ट्रेलर; पाहा व्हिडीओ