Mere Mehboob Mere Sanam : चांगल्या गाण्याची वाट लावली, नवीन गाणी बनवता येत नाहीत का? विकी कौशलच्या चित्रपटात 'मेरे मेहबूब मेरे सनम' चा रिमेक; नेटकरी संतापले
Mere Mehboob Mere Manam Bad Newz : विकी कौशलच्या बॅड न्यूज चित्रपटातील 'मेरे मेहबूब मेरे सनम' हे नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. 90 च्या दशकातील क्लासिक गाण्याच्या रिमेकवर नेटकरी संतापले आहेत.
मुंबई : अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी बॅड न्यूज चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील तौबा तौबा गाणं रिलीज झालं होतं. या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच कल्ला केला. तौबा तौबा गाणं रिलीज झाल्यापासूनच ट्रेंडिंगमध्ये होतं. हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं. आता या चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं जुन्या गाण्याचं रिमेक व्हर्जन आहे. बॅड न्यूज चित्रपटातील 'मेरे मेहबूब मेरे सनम' हे नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. मात्र, या गाण्यावर जोरदार टीका होत आहे.
विकी कौशलच्या चित्रपटात 'मेरे मेहबूब मेरे सनम' गाण्याचा रिमेक
'मेरे मेहबूब मेरे सनम' हे गाणं तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. अनेकांच्या हे गाणं आवडतं आहे. 1998 मध्ये आलेल्या 'डुप्लिकेट' चित्रपटातील हे गाणं आता रिक्रिएट करण्यात आलं आहे. अभिनेता विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्या 'बॅड न्यूज' या चित्रपटात 'मेरे मेहबूब मेरे सनम' गाण्याचा रिमेक व्हर्जनचा वापर करण्यात आला आहे. या एव्हरग्रीन गाण्याच्या रिक्रिएशनमुळे चाहते निर्मात्यांवर चांगलेच संतापले आहेत.
'चांगल्या गाण्याची वाट लावली, नवीन गाणी बनवता येत नाहीत का?'
View this post on Instagram
रिमेकवर नेटकरी भडकले
मेरे मेहबूब मेरे सनम हे गाण्याचा रिमेक बॅड न्यूज चित्रपटामध्ये वापरल्यामुळे चाहत्यांनी यावर जोरदार टीका केली आहे. विकी कौशलने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर या गाण्याची झलक शेअर केली आहे. दरम्यान, हे क्लासिक गाणं खराब केल्याबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला आहे. 'मेरे मेहबूब मेरे सनम' 1998 मध्ये शाहरुख खान आणि जुही चावला आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर चित्रित झालं होतं. या क्लासिक गाण्याचा रिमेक पाहून नेटकऱ्यांनी निर्मात्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
चाहत्यांनी व्यक्त केला संताप
विकी कौशलच्या पोस्टवर एका यूजरने लिहिलं की, 'शाहरुख खानच्या क्लासिक गाण्याची वाट लावली. या सुंदर गाण्यासोबत छेडछाड का केली?' आणखी एका युजरने लिहिलं आहे की, 'माझ्या लहानपणीचं आवडतं गाणं त्यांनी असं का खराब केलं?' एकाने म्हटलं की, 'शाहरुख खान, जुही चावला आणि सोनाली बेंद्रेशिवाय या गाण्याची कल्पनाही करता येणार नाही. 90 च्या दशकातील सुंदर आठवणींवर पाणी फेरलं.' एका वापरकर्त्याने म्हटलं, 'गाणे आणि दृश्य... जुळत नाही... रायता... अयशस्वी.' एका यूजरने म्हटलं की, 'नवीन गाणी बनवता येत नाहीत का?' आणखी एकाने लिहिलं की, 'चांगले गाणं खराब केलं. जुनी गाणी खराब करू नका, स्वतःची नवीन गाणी बनवा.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :