Shah Rukh Khan : शाहरुख खानने 23 वर्षांपूर्वी मुंबईत विकत घेतलाय आलिशान बंगला; जाणून घ्या 'किंग खान'च्या मन्नतबद्दल सर्वकाही
Shah Rukh Khan House : शाहरुख खानला 'बॉलिवूडचा किंग' (Bollywood King) म्हटलं जातं. लोकप्रियता आणि पैशाच्या बाबतीत शाहरुख खान आघाडीवर आहे. शाहरुखकडे कोट्यवधींचं घर, महागड्या गाड्या आणि पैसा असं सर्वकाही आहे.
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. किंग खानच्या (King Khan) प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. चित्रपटाप्रमाणे त्याच्या 'मन्नत' (Mannat) या बंगल्याचीदेखील चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मन्नतची एक झलक पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते त्याच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. त्याचा हा बंगला आलिशान आहे. त्यामुळे शाहरुखसह या बंगल्यासंबंधित प्रत्येक अपडेट चाहते उत्सुकतेने जाणून घेत असतात. शाहरुखचा बंगला 'मन्नत' या नावाने लोकप्रिय असला तरी त्याचं खरं नाव मात्र काहीतरी वेगळचं आहे.
'मन्नत' या बंगल्यात शाहरुख खान पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान आणि दोन मुलं आर्यन आणि अबरामसोबत राहतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'मन्नत' हा बंगला शाहरुख खानने 2001 मध्ये खरेदी केला होता. सहा मजली हा बंगला 27,000 स्क्वेअर फूट पसरला आहे. शाहरुखचा हा बंगला एखाद्या राजमहालापेक्षा कमी नाही. 'मन्नत' सजावण्याचं संपूर्ण क्रेडिट गौरी खानला (Gauri Khan) जातं. गौरी एक उत्कृष्ट इंटिरिअर डिझायनर आहे.
किंग खानच्या बंगल्याचं नाव 'मन्नत' नव्हतंच... (Shah Rukh Khan Mannat Real Name)
शाहरुखने 'मन्नत' हा बंगला विकत घेतला तेव्हा या बंगल्याचं नाव काहीतरी वेगळचं होतं. 'मन्नत' या बंगल्याचं नाव पूर्वी 'विला वियना' असं होतं. पुढे किंग खानने या बंगल्याचं नाव बदललं आणि 'मन्नत' असं ठेवलं. 'मन्नत' हा उर्दू शब्द आहे. या शब्दाचा अर्थ 'प्रार्थना' असा होतो. गौरी खानने 'मन्नत' हा बंगला खूप सुंदर सजावला आहे. संपूर्ण घर छान पद्धतीने डेकोरेट केलं आहे. 'मन्नत' या बंगल्याबाहेर एक काचेची नेम प्लेट आहे. शाहरुखचे लाखो चाहते दररोज या नेम प्लेट जवळ उभं राहून फोटो काढत असतात.
'मन्नत' कसा आहे?
'मन्नत'च्या आतमध्ये क्रीम कलर देण्यात आला आहे. तसेच चॉकलेटी रंगाच्या फर्नीचरने घराला क्लासी लूक देण्यात आला आहे. सोनेरी रंगाच्या आरश्यांमुळे घर खूपच कमाल झालं आहे. बेडरुममध्ये काळ्या रंगाच्या भिंती आहेत. एकंदरीतच मॉर्डन टच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भिंती खूप छान पद्धतीने सजवण्यात आल्या आहेत. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये एक आहे. एका चित्रपटासाठी तो 150 ते 250 कोटी रुपये मानधन घेतो. शाहरुख खानची एकूण संपत्ती 6400 कोटींपेक्षा अधिक आहे.
संबंधित बातम्या