एक्स्प्लोर

Jawan Trailer : शाहरुखच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला! बुर्ज खलिफावर होणार'जवान'च्या ट्रेलरचं स्क्रीनिंग

Jawan Trailer : शाहरुख खानच्या 'जवान'च्या ट्रेलरचं स्क्रीनिंग बुर्ज खलिफावर होणार आहे.

Jawan Trailer Release Date : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांना या सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता लागली आहे. 'जवान'या सिनेमाच्या ट्रेलरचं दुबईतील (Dubai) बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) स्क्रीनिंग होणार आहे.  

शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंग खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना 'जवान'च्या ट्रेलरची महत्त्वाची अपडेट दिली आहे. 'जवान' या सिनेमाचा ट्रेलर (Jawan Trailer Release Date) 31 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जवान'चा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

शाहरुखने ट्वीट काय केलं आहे? (Shah Rukh Khan Tweet)

शाहरुखने ट्वीट करत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बुर्ज खलिफावर 'जवान'चं पोस्टर झळकलेलं दिसत आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"जवान'चा आनंद मी तुमच्यासोबत साजरा करू शकत नाही, असं होऊ शकत नाही. बुर्ज खलिफावरुन मी 31 ऑगस्टला रात्री 9 वाजता तुमच्या भेटीला येच आहे. माझ्यासोबत 'जवान'चा ट्रेलर तुम्हीही पाहा. जगातील सर्वात सुंदर गोष्ट प्रेम आहे. प्रेमाच्या रंगात न्हाऊन जायला तुम्ही तयार आहात का?". 

'जवान' कधी होणार रिलीज? (Jawan Release Date)

शाहरुख खानचा बहुचर्चित 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक एटली कुमार यांनी केलं आहे. 'जवान' या सिनेमात शाहरुख खानसह नयनतारा, योगी बाबू, रिद्धी डोगरा आणि सुनील ग्रोवर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची (Deepika Padukone) झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा पॅन इंडिया सिनेमा आहे. या सिनेमात शाहरुखचे सहा वेगवेगळे लूक पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करणार आहे. 'पठाण'चा रेकॉर्ड हा सिनेमा ब्रेक करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. परदेशानंतर आता भारतातही या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुख खान! मुंबईत 'जवान'चे एक मिनिटात विकले गेले 1100 तिकीट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget