Jawan OTT Release : शाहरुखचा 'जवान' लवकरच ओटीटीवर येणार! 200 कोटी रुपयांत विकले गेले राईट्स
Jawan : शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे.
Shah Rukh Khan Jawan OTT Release : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धमाका करत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने दणदणीत कमाई केली आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
शाहरुख खानच्या 'जवान' या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. 'जवान' या सिनेमात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दीपिरा पादुकोण आणि संजय दत्तची झलकही या सिनेमात पाहायला मिळत आहे. 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
ओटीटीवर रिलीज होणार 'जवान'
'जवान' हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2 नोव्हेंबर 2023 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. किंग खानच्या वाढदिवसानिमित्त त्याचा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहे. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास घरबसल्या 'जवान' सिनेमा पाहता येणार आहे.
View this post on Instagram
'जवान' या सिनेमाच्या ओटीटी रिलीजबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अभिनेत्याच्या वाढदिवशी त्याचा सिनेमा ओटीटीवर रिलीज करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने 250 कोटी रुपयांमध्ये 'जवान'चे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत. 'जवान' या सिनेमात शाहरुख खान आणि नयनतारासह सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, गिरीजा ओक आणि सुनील ग्रोवर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
शाहरुखच्या 'जवान'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला (Jawan Box Office Collection)
'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 620.78 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 1103.27 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'जवान' सिनेमाने इतिहास रचला आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हा हिंदी सिनेमा ठरला आहे.
'जवान' या सिनेमानंतर शाहरुख खान 'डंकी' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तो तापसी पन्नू आणि विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. क्रिसमसमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.
संबंधित बातम्या