एक्स्प्लोर

धक्कादायक! पार्किंगच्या वादातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, लोखंडी पाईप, हातातील कड्यानं बेदम मारहाण

मारहाणीत आरोपींनी लोखंडी टेबल, लोखंडी पाईप, आणि हातातील कड्याचा वापर केला. या प्राणघातक हल्ल्यात किताबउल्लाह शेख गंभीर जखमी झाले.

विक्रोळी: गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणातून हत्या,मारहाण, गुन्हेगारीनं कळस गाठलाय. दरम्यान, विक्रोळी पश्चिमेच्या सुर्यानगर परिसरात पार्किंगच्या वादातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शाब्दिक वादाचं रुपांतर हत्येपर्यंत गेल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून तिघांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. पार्किंगवरून सुरु झालेला वाद हाणामारीत गेला.  लोखंडी टेबल, लोखंडी पाईप, आणि हातातील कड्याचा वापर करत तिघांनी 41 वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेतच या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

शाब्दिक चकमकीला हत्येचं रुप

विक्रोळीच्या इस्लामपुरा नुराणी मस्जिदकडून जाणाऱ्या रस्त्यावर आर. आर. इंटिरिअर दुकानासमोर गाडी पार्क करण्यावरून वाद उफाळला. हा वाद सुरुवातीला शाब्दिक वादापुरता सीमित होता, मात्र त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी मोहम्मद तारिक जैनूर आब्दीन (34 वर्षे), कलिम मुनोवर खान (48 वर्षे), फुरकान इस्तियाक अहमद खान (19 वर्षे), आणि जीशान इस्तियाक अहमद खान (21 वर्षे) या चार आरोपींनी किताबउल्लाह शेख यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

प्राणघातक हल्ला, एकाची हत्या

मारहाणीत आरोपींनी लोखंडी टेबल, लोखंडी पाईप, आणि हातातील कड्याचा वापर केला. या प्राणघातक हल्ल्यात किताबउल्लाह शेख गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी जवळच्या महात्मा फुले रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी तातडीने कारवाई करत  आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. हा प्रकार परिसरात खळबळ निर्माण करणारा ठरला असून पार्किंगसारख्या किरकोळ वादातून जीवघेणा वाद होणे चिंतेची बाब असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आलाय.

अखिलेश शुक्लाला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट

मराठी माणसांविषयी गरळ ओकणारा आणि कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणारा सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) याला शुक्रवारी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर अखिलेश शुक्ला याच्याविरोधात एकापाठोपाठ एक कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. कल्याण उपप्रादेशिक परिवहन महामंडळाने अखिलेश शुक्ला याची खाजगी गाडी ताब्यात घेतली असून या गाडीला नऊ हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. (Kalyan Attack Marathi Family) 



हेही वाचा:

Kalyan attack marathi family: कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे दिवस फिरले, पोलिसांनी दिव्याचा तोरा उतरवला, आरटीओने दंड ठोठावला

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hingoli FDA Action: हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
हिंगोलीत प्रसिद्ध खिचडी-भजीच्या चवीवर अस्वच्छतेचा डाग; खिचडीत चक्क आळ्या, अन्न विभागाची धडक कारवाई, महाराजा हॉटेलचा परवाना रद्द!
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Embed widget