Jawan Review : शाहरुख खानचा 'जवान' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...
Jawan Review : शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Atlee Kumar
SHAH RUKH KHAN, vijay sethupathi, Priyamani, Nayanthara
Shah Rukh Khan Jawan Review : 'बेटे को हाथ लगाने से पहले बापसे बात कर...' 'जवान' (Jawan) सिनेमाचा ट्रेलर आला आणि हा डायलॉग चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर शाहरुखच्या (Shah Rukh Khan) तोंडून हा डायलॉग ऐकण्याची आणि ते पाहण्याची उत्सुकता लागली. पण माझी ही इच्छा पूर्ण झालीच नाही. थिएटरमध्ये प्रेक्षकांचा जल्लोष, टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज होत असताना हा डायलॉग मला ऐकूच आला नाही. खरं तर ही शाहरुख खान या नावाची जादू आहे. थिएटरचं रुपांतर स्टेडियममध्ये करण्यात अभिनेता यशस्वी झाला आहे.
शाहरुख खानचा 'जवान' (Jawan Review) हा सिनेमा शानदार आहे. पैसा वसूल सिनेमा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत बॉक्स ऑफिसचा बादशाह ठरलेल्या शाहरुखची क्रेझ आजही कायम आहे आणि ती लवकर संपणार नाही.
'जवान' सिनेमाचं कथानक काय? (Jawan Movie Story)
वाईट सरकारी व्यवस्थेमुळे उद्ध्वस्त झालेल्या तरुणाची गोष्ट 'जवान' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. त्यानंतर त्याचा मुलगा ही स्वत:च ही यंत्रणा दुरुस्त करतो. एकंदरीतच भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. गरिबांचे हक्क, शेतकऱ्यांची आत्महत्या अशा विषयांवर या सिनेमात भाष्य करण्यात आले आहे. बिघडलेल्या व्यवस्थेचा प्रश्न या सिनेमात दाखवण्यात आला आहे. योग्य नेता असणं ही काळाची गरज आहे हा मुद्दा या सिनेमात मांडण्यात आला आहे. एक चांगलं कथानक असलेला दर्जेदार सिनेमा पाहायचा असेल तर थिएटरमध्ये जाऊन 'जवान' हा सिनेमा नक्की पाहा.
कसा आहे शाहरुखचा 'जवान'?
'जवान' सिनेमा सुरू होतो. पण सुरुवातीचे 30 मिनिटं सिनेमाचा वेग मंदावतो. पण हळूहळू सिनेमात ट्विस्ट यायला सुरुवात होते. सिनेमात एकापेक्षा एक ट्विस्ट येतात आणि तुम्ही थक्क होता. शाहरुखच्या अभिनयाची जादू फक्त रुपेरी पडद्यावर पाहण्यातच खरी मजा आहे. त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. शाहरुखचे वेगवेगळे रुप पाहताना मजा येते.
पांढरे केस, दाढी अशा लूकमध्ये शाहरुख जेव्हा झळकतो तेव्हा हँडसम म्हणारा वाटतो. शाहरुख फक्त रोमान्सचा बादशाह नाही तर बॉलिवूडचा बादशाह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. गाणी कंटाळवाणी असली तरी सिनेमा चांगला आहे. शेवटपर्यंत सिनेमा प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन करतो.
शाहरुख खानच्या अभिनयाला तोडच नाही. त्याच्या प्रत्येक डायलॉगला प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत. 'जवान' या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने स्वत:ची इमेज ब्रेक करण्याचा प्रयत्न करणार आहे. विजय सेतुपतीने खलनायकाची भूमिका उत्तम वठवली आहे. नयनताराने आपली भूमिका चोख बजावली आहे. दीपिकाची भूमिका छोटी असली तिने तिनेही चांगलं काम केलं आहे. रिद्दी डोगरा आणि सान्या मल्होत्राचंही कौतुक. एकंदरीतच सर्वांनीच चांगलं काम केलं आहे.
एटली कुमारने (Atlee Kumar) खूप चांगल्या प्रकारे 'जवान' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्स कमाल आहेत. तर सिनेमातील काही सीक्वेन्स थक्क करणारे आहेत. रवी चंदरने सिनेमाला म्यूझिक दिलं आहे. शाहरुखचे चाहते असाल तर सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा नक्की पाहा...
संबंधित बातम्या