Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा; फोटो व्हायरल
Shah Rukh Khan : शाहरुख खान आणि त्याच्या धाकट्या मुलाने अबरामने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Shah Rukh Khan Eid Wishes : आज जगभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. किंग खान आणि त्याचा धाकटा मुलगा अबरामने मन्नतच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देतानाचे शाहरुखचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ईदच्या दिवशी शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी त्याचे हजारो चाहते मन्नतबाहेर गर्दी करत असतात. यंदाही मन्नतच्या बाहेर चाहते जमले आणि शाहरुखने चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. किंग खानला भेटण्यासाठी मन्नतबाहेर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते.
View this post on Instagram
शाहरुख चाहत्यांना भेटण्यासाठी मन्नतच्या बाल्कनीत आला तेव्हा त्याचा धाकटा मुलगा अबरामही त्याच्यासोबत होता. दरम्यान शाहरुख कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाला. त्याने पांढऱ्या टी-शर्टसोबत निळ्या रंगाची कार्गो पॅन्ट घातली होती. तर अबरामने लाल टी-शर्ट घातले होते. शाहरुख आणि अबरामचा चाहत्यांना शुभेच्छा देतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शाहरुखचे आगामी सिनेमे
शाहरुखचे आगामी सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख अनेक दिवसांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. या सिनेमात तो दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. तसेच त्याचे 'डंकी' आणि 'जवान' हे सिनेमेदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
संबंधित बातम्या