Pathaan: '...म्हणून बेशरम रंग गाणं झालं हिट'; गायिकेनं सांगितलं कारण
पठाणमधील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणे आता हिट झाले आहे. या गाण्याची गायिका शिल्पा रावनं (Shilpa Rao) नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हे गाणं हिट होण्यामागचे कारण सांगितले.
Pathaan: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटानं जगभारातील बॉक्स ऑफिसवर 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटांमधील गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. पठाणमधील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते पण हे गाणे आता हिट झाले आहे. बेशरम रंग या गाण्याला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्याची गायिका शिल्पा रावनं (Shilpa Rao) नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हे गाणं हिट होण्यामागचे कारण सांगितले.
काय म्हणाली शिल्पा राव?
शिल्पा रावनं सांगितलं, 'बेशरम रंग या गाण्यामध्ये दीपिका आणि शाहरुखची केमिस्ट्री खूप छान दिसली आहे. एखादे गाणे उत्तम असावे, असं माझं मत आहे. यासाठी सुर आणि गाण्याचे बोल चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून लोक या गाण्यासोबत जोडले जातील.'
शिल्पा रावनं बेशरम रंग हे गाणं हिट होण्यामागचे कारण देखील सांगितले. ती म्हणाली, 'मला असे वाटते की हे गाणे इतके हिट होण्यामागील एकमेव कारण म्हणजे लोकांना या गाण्याचा खरा अर्थ समजला आहे, तुम्ही जसे आहात तसे स्वतःवर प्रेम करा आणि व्यक्त व्हा असा या गाण्याचा अर्थ आहे. लोकांना ही गोष्ट समजली. त्यामुळेच ते व्यक्त होत आहेत आणि त्यामुळेच हे गाणे लोकप्रिय झाले आहे.'
बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या बिकीनीच्या रंगावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. अनेकांनी हा चित्रपट बॉयकॉट करण्याची देखील मागणी केली होती. पण पठाणमधील बेशरम रंग आणि झुमे जो पठाण या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
View this post on Instagram
पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सलमान खाननं देखील कॅमिओ केला आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: