Pathaan Box Office Collection Day 8: पठाणची जादू बॉक्स ऑफिसवर कायम; आठव्या दिवशीही कमावला कोट्यवधींचा गल्ला
शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण या चित्रपटानं केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Pathaan Box Office Collection Day 8: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात 'पठाण' (Pathaan) फिवर पाहायला मिळत आहे. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण या चित्रपटानं केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहरुखनं पठाण या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. हा चित्रपट रिलीज होऊन आठ दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत...
पठाणचं कलेक्शन
सिद्धार्थ आनंदनं दिग्दर्शित केलेल्या पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर आठव्या दिवशी म्हणजेच, बुधवारी (1 फेब्रुवारी) 18 कोटींची कमाई केली आहे. रमेश बाला यांनी ट्वीट शेअर करुन पठाणच्या कलेक्शनची माहिती दिली आहे. लवकरच हा चित्रपट 350 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे.
#Pathaan early estimates for All-India Nett for Day 8 is around ₹ 18 Crs..
— Ramesh Bala (@rameshlaus) February 2, 2023
In 8 days, #Pathaan WW Gross nears ₹ 675 Crs.. Early estimates
— Ramesh Bala (@rameshlaus) February 2, 2023
रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 'पठाण' चित्रपटानं 55 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 68 कोटी, तिसऱ्या दिवशी 38 कोटी, चौथ्या दिवशी 51.50 कोटी आणि पाचव्या दिवशी 65 कोटींची कमाई केली आहे. तसेच, सहाव्या दिवशी या चित्रपटानं भारतामध्ये 25 कोटींचे कलेक्शन केलं आहे. मंगळवारी (31 जानेवारी) या चित्रपटानं 23 कोटींचे कलेक्शन केलं आहे.
पठाणनं केला रेकॉर्ड
पठाण चित्रपट हा 300 कोटींच्या क्लबमध्ये सर्वात लवकर सामील होणारा चित्रपट ठरला आहे. पठाण हा चित्रपट बाहुबली-2 हिंदी (10 दिवस), 'केजीएफ 2' हिंदी (11 दिवस), दंगल (13 दिवस), संजू (16 दिवस), टायगर जिंदा है (16 दिवस), पिके (17) वॉर (19), बजरंगी भाईजान (20 दिवस), सुल्तान (35 दिवस) या चित्रपटांना मागे टाकत सर्वात कमी दिवसात 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट ठरला आहे.
‘PATHAAN’ FASTEST TO ENTER ₹ 300 CR CLUB…
— taran adarsh (@taran_adarsh) January 31, 2023
⭐️ #Pathaan: Day 7
⭐️ #Baahubali2 #Hindi: Day 10
⭐️ #KGF2 #Hindi: Day 11
⭐️ #Dangal: Day 13
⭐️ #Sanju: Day 16
⭐️ #TigerZindaHai: Day 16
⭐️ #PK: Day 17
⭐️ #War: Day 19
⭐️ #BajrangiBhaijaan: Day 20
⭐️ #Sultan: Day 35#India biz. Nett BOC. pic.twitter.com/xmoBvX0m9g
पठाण चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सलमान खाननं देखील कॅमिओ केला आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :