Pathaan: 'बेशरम रंग नाही तर लोकांचे...'; अभिनेत्रीच्या ट्वीटनं वेधलं लक्ष
काही नेटकऱ्यांनी बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या बिकीनीच्या रंगावर आक्षेप घेतला. सध्या पठाण (Pathaan) चित्रपटातील हे गाणे वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.
Pathaan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं रिलीज झालं . हे गाणं रिलीज झाल्यानंतर काहींनी या गाण्याचं कौतुक केलं तर काहींनी या गाण्याला ट्रोल केलं. काही नेटकऱ्यांनी या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या बिकीनीच्या रंगावर आक्षेप घेतला. आता अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीनं (Suchitra Krishnamoorthi) एक ट्वीट शेअर करुन या गाण्याचं नाव न घेता गाण्याला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.
सुचित्रा कृष्णमूर्तीचं ट्वीट
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कभी हाँ कभी ना' या शाहरुखच्या चित्रपटात आना ही भूमिका साकारुन अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीला विशेष लोकप्रियता मिळाली. सुचित्रानं नुकतेच एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये सुचित्रानं पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याच्या नावाचा उल्लेख न करता प्रतिक्रिया दिली आहे. सुचित्रानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'रंग बेशरम असू शकत नाहीत. लोकांचे हेतू हे बेशरम असू शकतात.' सुचित्रा कृष्णमूर्तीच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
Rang kabhi besharam nahin ho sakte. Besharam hote hai logon ke iraade.
— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) December 18, 2022
🙄🙄🙄
चुनौती या मालिकेमध्ये सुचित्रा कृष्णमूर्तीनं काम केले. किलुक्कम्पेट्टी, कभी हाँ कभी ना, माय वाइफ'ज मर्डर, आग, कर्मा कन्फ़्यूजन अँड होली, मित्तल वर्सिस मित्तल, रण या चित्रपटातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
'बेशरम रंग' गाण्यातील शाहरुख आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट 8 देशांमध्ये शूट झाला आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तानमध्ये याचे चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाची शाहरुख आणि दीपिकाचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: