एक्स्प्लोर
'चला हवा येऊ द्या'साठी काजोलकडून अजयला मराठीचे धडे
मुंबईः अभिनेता अजय देवगणचा 'शिवाय' सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. प्रमोशनसाठी अजय देवगण आणि पत्नी काजोल 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पोहचले. मात्र त्यापूर्वी काजोलने अजय देवगणचा मराठीचा क्लास घेतला.
सेटवर पोहचण्यापूर्वी काजोलने अजय देवगणकडून मराठीत चला हवा येऊ द्या म्हणून घेतलं. काजोलने हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. काजोलने 'शिवाय'च्या निमित्ताने पहिल्यांदाच फेसबुकवर पाऊल ठेवलं आहे.
शिवाय हा अजय देवगणचा अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन असणारा सिनेमा आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 28 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होत आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये सिनेमाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement